सध्या फेब्रुवारी महिना सुरू आहे. या महिन्यात येणारा व्हॅलेंटाईन विक साजरा करण्यासाठी सर्वचजण उत्सुक आहेत. कॉलेजमध्ये जाणारे तरूण तरूणी तर व्हॅलेंटाईन पार्टीचेही नियोजन करतात. पण, काहींसाठी हा महिना ‘दिल’ तोडणाराही ठरू शकतो. कारण, प्रपोज केल्यानंतर जोडीदार नकारही देऊ शकतो.
काही आधीच कपल्स म्हणून मिरवत असलेले लोक एकमेकांची साथ सोडून दुसऱ्या पार्टनरचा विचार करू शकतात. जेव्हा कपल्समध्ये दुरावा निर्माण होतो. तेव्हा तो केवळ त्यांच्या मनातच नाही तर त्यांच्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्सवरही जाणवू शकतो. तर, एका संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, कपल्समध्ये ब्रेकअप होणार आहे, याची भविष्यवाणी फेसबुक इन्स्टाग्राम करतात.
जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेल्या असतात. आणि जेव्हा ते एकमेकांपासून वेगळे होण्याचा विचार करतात. तेव्हा त्यांचा सोशल मिडियावरील पोस्ट आणि वावर विचित्र असतो. याबाबत ‘रेडइट’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात सुमारे 7 हजार लोकांनी सहभाग घेतला होता.
यासाठी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून या लोकांच्या खाजगी आयुष्याचा मागोवा घेण्यात आला. सामाजिक, भावनिक आणि आकलनाच्या आधारे या लोकांचे जीवन जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आधारे असे आढळून आले की, कोणतेही सोशल मीडिया खाते मग ते फेसबुक किंवा इंस्टाग्राम हे सहजपणे सांगू शकते की येत्या तीन महिन्यांत हे जोडपे ब्रेकअप करणार आहे की नाही.
सर्व्हेमध्ये असेही सांगण्यात आले की, ब्रेकअप होईल अशी माहिती अगोदरच असेल. तर माणूस नैराश्य, तणाव टाळू शकतो किंवा नाते घट्ट करण्याचा प्रयत्न करू शकतो, त्यामूळे लोकांना याचा फायदा होईल.
कसे ओळखावे ब्रेकअप होणार ते
एखाद्याच्या मनात ब्रेकअपचे प्लॅनिंग सुरू असेल तर त्याची लेखनशैली बदलते. अशा परिस्थितीत ती व्यक्ती आपण, आपली याऐवजी मी किंवा माझे असे शब्द वापरू लागते.
ती व्यक्ती जोडीदाराच्या फोटोवर कमेंट करणे थांबवते किंवा जोडप्याचे फोटो पोस्ट करणे थांबवते.
जोडीदाराने त्या व्यक्तीला टॅग करून काहीतरी पटवून देण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे उत्तर 'कदाचित' किंवा 'विचार करून बोला' अशा शब्दांत असते.
व्यक्ती फोटोमध्ये त्याचे भविष्य दाखवण्याचा प्रयत्न करते आणि वेदनादायक पोस्ट टाकू लागते.
ब्रेकअपचा विचार आला तर...
जर तुमच्या मनात ब्रेकअपचा विचार येत असेल. तर सर्वात आधी तुमच्या जोडीदारासमोर बसून बोला, जर तो म्हणत असेल की तो या नात्याबद्दल गंभीर नाही तर जोडीदाराने वेगळे होणे चांगले. जर त्याला हे नाते पुढे न्यायचे असेल, परंतु काही वाद असतील तर ते दूर करण्याचा प्रयत्न करा.
समजूतीने केलेला ब्रेकअप योग्य
म्युच्युअल ब्रेकअपचे अनेक फायदे आहेत. यामुळे तुम्ही डिप्रेशनचा शिकार होणार नाही. तुम्ही तुमच्या त्या पार्टनरसोबत वाईट विचार करू नका. त्यामूळे मैत्री टिकून राहते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.