Relationship Tips : सासूला कायम खुश ठेवण्यासाठी सद्गुरूंनी सुनांना दिला हा खास मंत्र, एकदा वाचाच

कधी सासूला सून चुकीची वाटू लागते तर कधी सुनेला सासू.
Relationship Tips
Relationship Tips esakal
Updated on

Relationship Tips : लग्नानंतर सासू सुनेचं आनंदी नातं टिकवणं हे सगळ्यांपुढे मोठं आव्हान असतं. लग्नाआधी प्रत्येक मुलीला सासू कशी मिळणार याची चिंता असते. सासू-सासऱ्यांशी संबंध टिण्यासाठी तिला तिच्या आई-वडिलांकडूनही अनेक सूचना मिळतात. पण व्यक्तीच्या स्वभावाचा वागण्याचा एकंदरीत प्रभाव नात्यावरही दिसून येतो. कधी सासूला सून चुकीची वाटू लागते तर कधी सुनेला सासू.

पण प्रत्यक्षात दोघांचीही चूक नाही, लग्नानंत संबंधित सासूच्या मुलाशी आणखी एका मुलीचं नातं जोडलं जातं. त्यामुळे विचारांचे काही मतभेद दोघींत होतात. म्हणूनच अनेक सूनांना अनेक प्रयत्न करूनही सासूला आनंदी ठेवणे अशक्य असते.

अशा परिस्थितीत जगदीश वासुदेव उर्फ ​​सद्गुरू यांचे जीवन तत्वज्ञान आणि त्यांनी सांगितलेले मूळ-मंत्र सासू-सुनेचे नाते घट्ट करू शकतात. एका सेशनमध्ये जेव्हा सद्गुरूंना एका महिलेने विचारले की मी माझ्या सासूसोबत राहते, तेव्हा मी तिला आणि स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी काय करू शकते? याला उत्तर देताना सद्गुरूंनी जे सांगितले ते सर्व विवाहित महिलांनी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

सासूला खुश कसे ठेवावे, हे सुनांनी सद्गुरूंकडून समजून घ्या

मुलीने सासू-सासरे आणि पती यांच्यातील नाते समजून घेणे खूप महत्वाचे आहे. कारण ते बदलण्याचा प्रयत्न केल्याने बहुतेक घरांमध्ये कलह निर्माण होतो.

सद्गुरु म्हणतात, जो मुलगा आज तुझा पती आहे, तोच आपल्या आईचा मुलगा आहे, जो आजपर्यंत आपल्या सर्व कामांसाठी आपल्या आईवर अवलंबून होता. अशा परिस्थितीत, आईला तिची जागा दुसरी स्त्री घेताना पाहणे थोडे कठीण आहे. तुम्हाला हे समजले पाहिजे की तुमच्या सासूला तुमच्याशी काही अडचण नाही, ती तिच्या मुलाच्या अगदी जवळ आहे.

Relationship Tips
Relationship Tips : चूक केलीय पण जोडीदाराची माफी मागायला कमीपणा वाटतोय? या गोष्टी लक्षात ठेवा!

लग्नानंतर मुलांमधील बदल सासूला सहन होत नाही

मुलं कितीही मोठी झाली तरी आईसाठी लहानच राहतात. म्हणूनच असे मानले जाते की मोठे झाल्यावर फक्त आईच एखाद्याला बालपणाचा अनुभवू देऊ शकते. कारण तिचे मुलांवरचे प्रेम कधीच बदलत नाही. (Relationship Tips)

सद्गुरु पुढे सांगतात की आईला हे कळत नाही की तिचा लहान मुलगा आता मोठा झालाय. अशा परिस्थितीत लग्न झाल्यानंतर मुलामध्ये झालेला अचानक बदल तिला स्वीकारता येत नाही. आयुष्यात गोष्टी बदलत असतात हे आईला पचवणं थोडं कठीण होतं.

Relationship Tips
Love Relationship ते लग्नाचा प्रवास यशस्वी पूर्ण करण्यासाठी सद्गुरूचा हा सल्ला नक्की वाचा

पतीला खुश ठेवण्यासाठी हा उपाय करा

पती आणि सासू यांपैकी कुणालाही दुःखी न करण्याचा प्रयत्न करा. रिलेशनशिपमध्ये काही गोष्टी स्वीकारणे खूप गरजेचे असते. हे समजल्यावर सासू असो, आई असो किंवा इतर कोणतीही स्त्री असो, सर्वांना आनंदी ठेवता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.