Relationship Tips : उधार पैसे देऊन तुम्ही घाईला आलाय? अशा लोकांना टाळायला ही कारणं उपयोगी पडतील

सतत उसणे पैसे मागणाऱ्या मित्राला कसं टाळावं?
Relationship Tips
Relationship Tipsesakal
Updated on

Relationship Tips :

या जगात देवी-देवतांना सोडलं तर प्रत्येकाला पैशांची आवश्यकता असते. कधी हौसमौजेला तर कधी एखाद्या दु:खद प्रसंगी पैसे हे लागतातच. जेव्हा स्वत:कडे जुळणा होत नसेल तेव्हा मित्र, कुटुंबातील सदस्य मदतीला येतात. ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. परंतू, मित्रांकडून घेतलेले पैसे परत करणे प्रत्येकाला जमत नाही.

उधारी ही एक अशी गुंतवणूक समजली जायची की मित्राला दिलेले पैसे तो आपल्या गरजेला परत करेल, अशी आशा होती. मात्र, काळ बदलला तशी लोकांची मानसिकताही बदललीय. त्यामुळे उधारीवर नेलेले पैसे परत देणारे लोकही आता कमीच सापडतात.

सतत एखादा मित्र पैसे मागत असेल तर त्याला पैसे द्यायलाही नको वाटते. कारण, दिलेली उधारी परत मिळेलच याची शक्यता नसते. अशा पाहुण्यांना अन् मित्र मंडळींना कसे टाळायचे याच्या काही ट्रिक्स पाहुयात.

Relationship Tips
Relationship Tips: लग्नापूर्वी कपल्सने एकत्र प्रवास का करावा? ही आहेत मोठी कारणे

थेट नकार द्या

उधारी द्यायची नसेल तर पैसे नाहीत, पैसे आले तर पाठवतो या उत्तरांपेक्षा थेट उत्तर द्या. कारण, अशा व्यक्तीला पैसे देऊन तुम्हीच घाईला आला असाल, तर पुन्हा पुन्हा त्यांना पैसे देऊ नका. त्यांना लागलेली ही सवय मोडा. त्यासाठी तुम्ही फिरवून उत्तर न देता थेट उत्तर द्या. त्यांना वाईट वाटेल पण तुमची मैत्री महत्त्वाची असली तर ते तुम्ही नकार दिल्यावरही नाराज होणार नाहीत.

तुमच्या गरजांबद्दल सांगा

तुम्हाला असं वाटत असेल की समोरील मित्र तुमच्याकडे पैसे मागणार आहे.तर, त्यांनी पैसे मागण्याआधीच तुम्ही तुमचे रडगाणे सुरू करा. म्हणजेच, तुमच्या गरजा, मुलांची फिज, दवाखान्याला झालेला खर्च इत्यांदीची यादीच त्या व्यक्तीपुढे वाचा. त्यामुळे तो तुमच्याकडे पैसे मागणार नाही.

Relationship Tips
Leave In Relationship : लिव्ह-इननंतर दुसऱ्या लग्नाचा प्रयत्न; समुपदेशनाने घडविला समेट

इमोशनल ब्लॅकमेल करा

उधारी मागणारा व्यक्ती प्रत्येकवेळी नवे कारण देत असतो. काहीवेळा लोक आई, बाळ आजारी आहे पैसे हवेत असे सांगत असतात. काहीवेळा ते रडतात की पैशांची गरज आहे. अशावेळी तुम्हीही उगीचच त्याला ब्लॅकमेल करा. तुम्हाला काय काय अडचणींचा सामना करावा लागतोय, याचे गाऱ्हाणे मित्राला सांगा.

तुमची उधारी सांगा

मित्राने पैसे मागितले तर तुम्हालाही कोणाचे तरी पैसे द्यायचे आहेत. तुम्ही स्वत: उधारीच्या ओझ्याखाली आहात हे त्या मित्राला सांगा. ज्यामुळे तो तुमच्याकडे

हे कारणही देऊन बघा

तुम्ही पैसे मागणाऱ्या व्यक्तीला तुमच्या पैशांवर तुमच्या वडिलांचे किंवा जोडीदाराचे नियंत्रण असल्याचेही सांगू शकता. तुम्ही त्याला सांगू शकता, 'यार, मी माझ्या इच्छेनुसार पैसे वापरू शकत नाही. मला एक-एक पैशाचा हिशोब द्यावा लागेल, मग तो मी तुला पैसे कसे देऊ? तरीही मित्र ऐकत नसेल तर थेट बायको, अथवा वडिलांनाच त्यांच्याशी बोलायला लावा. ज्यामुळे लाजून मित्र पैसै मागणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.