Relationship Tips : पुरुषांच्या ‘या’ वाईट सवयी महिलांना नाही आवडत, लगेचच करा सुधारणा अन्यथा…

Relationship Tips For Men : पुरुषांच्या काही सवयी अशा असतात ज्या महिलांना अजिबातच आवडत नाहीत. तुमचं देखील लग्न झाले असेल किंवा गर्लफ्रेंड असल्यास या गोष्टींची नक्की काळजी घ्या; अन्यथा तुमचे नाते धोक्यात आहे.
Relationship Tips For Men
Relationship Tips For Men Sakal
Updated on

नाते गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचे असो किंवा पती-पत्नीचे, प्रत्येक नाते जपण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न होणे महत्त्वाचे असते. दोघांपैकी एकाने माघार घेऊन नाते जपले असेल तर दुसऱ्यानेही पुढाकार घेऊन नाते सांभाळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. 

Relationship Tips For Men
फॅमिलीसोबत नातं घट्ट करायचं आहे? ‘क्राईम पेट्रोल’च्या अभिनेत्रीनं दिल्या सोप्या टिप्स

प्रयत्न आणि संवादाच्या बळावरच कोणतेही नाते दीर्घकाळासाठी टिकते. कोणत्याही व्यक्तीसोबत नाते जोडताना काही महिला बराच वेळ घेतात आणि पुरुषांमधील काही गोष्टींचंही बारकाईने निरक्षण करतात, उदाहरणार्थ मुलाचे विचार कसे आहेत, स्वभाव कसा आहे, इतरांसोबतचे वर्तन कसे आहे, इत्यादी... 

Relationship Tips For Men
Self Care Tips For Mental Health आयुष्यात मित्रमैत्रिणीच नाहीत? मग असे ठेवा स्वतःला आनंदी

नात्यांमधील या गोष्टींमुळे एकतर तुमचे नाते मजबूत होते किंवा कमकुवत होण्याची शक्यता असते. कारण अनेकदा नात्यांमध्ये कटुता निर्माण होण्यास याच सवयीही जबाबदार ठरू शकतात.

पुरुषांच्या कोणत्या सवयी महिलांना मुळीच पसंत नाही, ज्यामुळे तुमचे नाते होऊ शकते कमकुवत; याबाबत जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Relationship Tips For Men
लग्नापूर्वी शारिरिक संबंध ठेवताना या गोष्टी ठेवा लक्षात

भावनिकरित्या एकमेकांशी बांधलेले नसणे

आपल्या जोडीदाराने आपले म्हणणे ऐकावे, भावनिक आधार द्यावा; अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. पण बहुतांश वेळा पुरुषमंडळी याकडे दुर्लक्ष करतात. जेव्हा महिला काही गोष्टी पुरुषांकडे शेअर करण्याचा प्रयत्न करतात.

तेव्हा ही मंडळी समजून घेणे तर सोडा पण ऐकणेही टाळतात. यामुळे महिला निराश होतात.  जर आपण वारंवार हीच चूक केली तर तुमचे नाते संपुष्टात येऊ शकते. म्हणूनच महिलांना भावनिक आधार द्यायला शिका.

जबाबदाऱ्यांकडे गांभीर्याने न पाहणे

कित्येक महिला घरासह ऑफिसमधील जबाबदाऱ्याही पार पाडतात. ही सर्व काम करताना त्यांची तारेवरचीच कसरत असते. पण समजा घराच्या एखाद्या कामामध्ये महिलांना तुमच्या मदतीची आवश्यकता असेल आणि तुम्ही मदत न केल्यास महिलांना ही बाब मुळीच आवडणार नाही. तुम्ही देखील पाहिले असेल की कित्येक जण आपल्या पत्नीला घरातील कामांमध्ये मदत करतात,  त्यामुळे त्यांचे नाते अधिक मजबूत होते.

प्रत्येक गोष्ट चुकीची ठरवणे

बहुतांश वेळेस पुरुषमंडळी प्रत्येक गोष्टीस महिलांनाच जबाबदार ठरवतात किंवा त्यांना अशा प्रकारे वागणूक देतात की महिलांना कोणत्याही गोष्टीसाठी योग्य निर्णय घेता येत नाही. तुम्ही देखील अशाच पुरुषांच्या गटात मोडता तर मग वेळीच स्वतःमध्ये सुधारणा करावी.

कारण महिलांना ही वागणूक अपमानजनक वाटते. यामुळे त्यांचे मन खोलवर दुखावले जाते. तर मंडळींनो तुम्हाला आपल्या जोडीदारासोबतचे नाते प्रिय असेल आणि ते टिकवायचे असेल तर नक्कीच वेळीच स्वतःच्या वाईट सवयी बदलण्याचा प्रयत्न करा, अन्यथा आपले नाते संपुष्टात येऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()