Relationships Tips : एक बेवफा है ! जोडीदार तुमचा फक्त वापर करून घेतोय का? कसे ओळखाल

if you feel like I'm being used by my boyfriend. What are warning signs that would point to that? | एक जोडीदार बाहेर मजा करत असतो तर दुसरा त्याच्या विचारात दिवस रात्र जागून डिप्रेशनमध्ये जात असतो.
if you feel like I'm being used by my boyfriend. What are warning signs that would point to that?
if you feel like I'm being used by my boyfriend. What are warning signs that would point to that?esakal
Updated on

Relationships Tips :

आजकाल अनेक जोडपी अशी आहेत जी मनात नसताना एकत्र राहत आहेत. काही वेळा दोघांमधील वाद त्यासाठी कारणीभूत ठरतात. तर काही वेळा कुटुंबातील कलह हे या जोडप्यांमधील प्रेम संपुष्टात येण्यास कारणीभूत ठरतात.

नात्यांमध्ये दोघांनी एकत्र राहणं जितकं गरजेचं आहे तितकं एकमेकांसाठी सर्व काही करणं हे सुद्धा महत्त्वाचा आहे. केवळ सोबत आहोत म्हणून नातं निभावतोय असं नको. तर एकमेकांची गरज आहे, आपुलकी आहे म्हणून एकमेकांसाठी एखादी गोष्ट करणे म्हणजेच प्रेम आहे. (Toxic Relationship Tips)

if you feel like I'm being used by my boyfriend. What are warning signs that would point to that?
Relationship Tips : तुम्हाला एखाद्याबद्दल असलेली भावना प्रेम आहे की आकर्षण, कसं ओळखाल?

काही नात्यात एक रिकामेपण जाणवतं. एक जोडीदार बाहेर मजा करत असतो तर दुसरा त्याच्या विचारात दिवस रात्र जागून डिप्रेशनमध्ये जात असतो. एक जोडीदार स्वतःला रूम मध्ये बंद करून घेऊन राहतो. तर दुसरा परदेश वाऱ्या करत असतो, याला जबाबदारी किंवा कामाचा भाग म्हणून अनेक वेळा दुर्लक्षित केलं जातं.

तुमचा जोडीदार सतत असं करत असेल, तर तुम्हाला एका गोष्टीचा विचार नक्की करायला पाहिजे. तुमचा जोडीदार तुमचा वापर करून घेतोय का?, हा विचार नक्की करा. कारण आजकाल जोडीदारावर असलेलं प्रेम हे केवळ दाखवण्यापुरतं उरलं आहे. म्हणजे माझी बायको किंवा माझा नवरा माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे सोशल मीडियावरती भरभरून लिहिलं जातं.

if you feel like I'm being used by my boyfriend. What are warning signs that would point to that?
Relationship Tips: बुमराह अन् संजनापासून शिका प्रेम कसं निभवायचं ते, महिनोंमहिने भेटत नाहीतर तरीही आहे अतूट नातं

सोशल मिडियावर कौतुक मिळवलं जातं. पण प्रत्यक्षात बायकोला किंवा नवऱ्याला किंमत दिली जात नाही. जर तुमचा जोडीदारही तुमचा फक्त वापर करून घेत असेल तर ते कसे ओळखायचे हे पाहूयात.

तो तुमच्याशी बोलातो का? (Relationship Tips)

जर तुमचा जोडीदार फक्त त्याला गरज असेल तेव्हा, तुमची काळजी घेत असेल. इतरवेळी तो त्याच्या कामात व्यस्त असेल. तर कदाचित तो तुमचा गैरफायदा घेत आहे. जर जोडीदार बोलण्यासाठी वेळ देत नसेल आणि तुम्ही मात्र सतत त्याच्याशी गप्पा मारत असाल तर तो तुमचा वापर करून घेतोय असं असू शकतं.

if you feel like I'm being used by my boyfriend. What are warning signs that would point to that?
Relationship Tips : बोलायचं खूप आहे पण सुरूवात कुठून करायची कळत नाही? या विषयांवर जोडीदारासोबत मारा दिलखुलास गप्पा

तुम्ही सांगितलेल्या गोष्टी तो गांभिर्याने घेतो का? (Signs of Toxic Relationship)

जर तुमचा जोडीदार तुम्ही सांगत असलेल्या गोष्टी फाट्यावर मारत असेल. तुमची एखादी गोष्ट तो दुर्लक्षित करत असेल तर तो कदाचित तुमचा गैरफायदा घेत आहे. तुमच्या जोडीदार शांत स्वभावाचा असला प्रेमळ असला तरी तुम्ही जे म्हणताय ते त्यांनी किमान ऐकून घेतलं पाहिजे हे तुमच्या अपेक्षा असेल. तीच तो पूर्ण करत नसेल आणि उलट त्याच्या गोष्टी मात्र तुम्हाला सतत सांगत असेल तर जरा विचार करा.

तुम्हीच पैसे खर्च करताय का? (Unhealthy Relationship)

जर एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यानंतर शॉपिंग करताना पैसे फक्त तुम्ही खर्च करताय आणि तो शांत राहतोय. तर कदाचित तो तुमचा फायदा घेत आहे. असंही नाही की प्रत्येक वेळी तुम्ही खर्च केला पाहिजे, कधीतरी त्यानेही खर्च करावा त्याने एखादी गोष्ट घेऊन द्यावी असं वाटणं प्रत्येक मुलीला किंवा मुलाला साहजिक आहे. त्यामुळे जोडीदार फक्त पैशांसाठी तुम्हाला वापरतोय का ह्यावर गंभीर विचार करा.

if you feel like I'm being used by my boyfriend. What are warning signs that would point to that?
Relationship Tips : प्रियकर छोट्या-छोट्या गोष्टींवरुन रागवत असेल तर अशी काढा त्याची समजूत

तो तुमच्या भावनांचा आदर करतो का ? (Relationship Issues)

तुमचा जोडीदार तुमच्याशी किती जोडलेला आहे हे समजून घ्या. तुम्ही नाराज असताना, तुम्ही इमोशनल असताना तो तुम्हाला वेळ देतोय का तो तुमची बाजू समजून घेतोय का? हे पहा. जेव्हा तुम्ही रडत असता तेव्हा तुमच्या जोडीदाराच्या मिठीची तुम्हाला गरज असते पण तेव्हा तो उपलब्ध नसेल तर त्याचं काहीच उपयोग नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या या वागण्यावर त्याच्याशी चर्चा करा.

if you feel like I'm being used by my boyfriend. What are warning signs that would point to that?
Relationship Tips : उधार पैसे देऊन तुम्ही घाईला आलाय? अशा लोकांना टाळायला ही कारणं उपयोगी पडतील

तुमच्या प्रश्नांची योग्य आणि खरी उत्तरं मिळतायंत का? (Couples In Relationship)

तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात किंवा तुमचं लग्न झालं आहे. जेव्हा तुम्ही विचार करून भाषा बद्दलच्या गोष्टी प्रश्न तुमच्या जोडीदाराला विचारतात. तेव्हा तो त्या प्रश्नांचे योग्य उत्तर देतोय का. की तुमच्या प्रश्नांना टाळाटाळ करतो. यावरूनही तुम्ही त्या व्यक्तीशी लग्न करावं की नाही याचा फेर विचार करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.