विवाहित स्त्रियांमध्ये पॉर्न पाहण्याचं प्रमाण अधिक!

...म्हणून विवाहित स्त्रियांमध्ये पॉर्न फिल्म्स पाहण्याचं प्रमाण आहे जास्त
 53 crimes in porn video cases in the Nagpur
53 crimes in porn video cases in the Nagpur
Updated on

उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) पती राज कुंद्रा (Raj kundra) याला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. साधारणपणे पॉर्न पाहण्याचं प्रमाण हे तरुण आणि अविवाहित व्यक्तींमध्ये अधिक असल्याचं म्हटलं जातं. मात्र, अलिकडेच यूरोपियन फेडरेशन ऑफ सेक्सोलॉजीने केलेल्या एका अभ्यासात विवाहित स्त्रियांमध्ये पॉर्न पाहण्याचं प्रमाण जास्त असल्याचं समोर आलं आहे. हा अहवाल 'सेक्सोलॉजीस'मध्ये प्रसिद्धही करण्यात आला आहे.(relationships love married and watching adult films ssj93)

प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, लग्नानंतर पुरुषांचं पॉर्न पाहण्याचं प्रमाण कमी होतं. तुलनेने स्त्रियांमध्ये हे प्रमाण वाढतं. विशेष म्हणजे यामागे अनेक कारणंदेखील आहेत.

विवाहित स्त्रियांमध्ये पॉर्न पाहण्याचं प्रमाण अधिक

हा अहवाल तयार करण्यापूर्वी युरोपमधील काही विवाहित जोडप्यांसोबत संवाद साधण्यात आला. यावेळी त्यांच्या सेक्शुअल लाइफमध्ये कोणता बदल झाला किंवा पॉर्न पाहण्याविषयी त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये ९% महिलांनी लग्नापूर्वी पॉर्न पाहत असल्याचं सांगितलं. तर २८% स्त्रियांनी लग्नानंतर पॉर्न पाहत असल्याचं कबुल केलं. विशेष म्हणजे महिलांच्या तुलनेत पुरुषांची आकडेवारी अगदीच उलट होती. लग्नापूर्वी २३% पुरुष पॉर्नोग्राफी पाहायचे. तर लग्नानंतर त्याचं प्रमाण १४% वर आलं होतं.

 53 crimes in porn video cases in the Nagpur
पॉर्न व्हिडीओ पाहणं घातक; निर्माण होतात 'या' समस्या

विवाहित स्त्रिया पॉर्न पाहण्याचं 'हे' आहे कारण

विवाहित स्त्रिया पॉर्न पाहण्यामागे दोन मुख्य कारणं जबाबदार आहेत. त्यातील एक म्हणजे फॅण्टसी आणि दुसरं आर्थिक-सामाजिक जबाबदाऱ्या. यात सेक्शुअल फॅण्टसीची इच्छा असलेल्या ६.९% स्त्रिया पॉर्न पाहत असल्याचं समोर आलं. तर अ काही स्त्रिया घरातील जबाबदाऱ्या आणि एकंदरीत ताण कमी करण्यासाठी पॉर्न फिल्म्स पाहतात.

लग्नानंतर पुरुषांवर आर्थिक, समाजिक जबाबदारी वाढते. त्यामुळे या सगळ्यामध्ये त्याचं सेक्शुअल लाइफकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे अनेकदा त्याच्या पार्टनरच्या इच्छांकडेही त्याचं दुर्लक्ष होतं. परिणामी, अनेक स्त्रिया त्यांच्या सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी पॉर्नोग्राफीचा आधार घेतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.