नात्यातील मानसिक शोषणाची लक्षणे वेळीच ओळखा

अशा गोष्टींमुळे तुमचा आत्मविश्वास ढासळू शकतो. अशावेळी तुम्ही निर्णय घेण्यासाठी योग्य व्यक्तीकडे गेले पाहिजे.
relationship
relationshipgoogle
Updated on

मुंबई : नात्यामध्ये जेव्हा मानसिक शोषण होऊ लागते तेव्हा माणसाची घुसमट सुरू होते; मात्र या गोष्टीची जाणीव होईपर्यंत तुमची मन:स्थिती ढासळलेली असते. नातं सांभाळण्याची जबाबदारी दोघांचीही असते. ते सांभाळण्यासाठी भावनिक अत्याचार सहन करावे लागत असतील तर अशा नात्यातून बाहेर पडणेच श्रेयस्कर असते. स्वत:साठी योग्य निर्णय घ्यायचा असल्यास आधी मानसिक शोषण कशाला म्हणतात हे समजून घेतले पाहिजे.

relationship
नातेसंबंध जोपासताना... (श्री श्री रविशंकर)

जेव्हा तुमचा जोडीदार प्रत्येक बारीकसारीक गोष्टीत तुम्हाला टोचून बोलू लागतो तेव्हा ते मानसिक शोषण असते. तो तुम्हाला त्याच्या निर्णयानुसार आयुष्य जगण्यास भाग पाडतो व तुमच्या निर्णयांमध्ये आडकाठी करतो. तुम्हाला लोकांशी नीट बोलता येत नाही किंवा तुम्हाला व्यावहारिक ज्ञान नाही याची जाणीव तो तुम्हाला सतत करून देत असतो. अशा गोष्टींमुळे तुमचा आत्मविश्वास ढासळू शकतो. अशावेळी तुम्ही निर्णय घेण्यासाठी योग्य व्यक्तीकडे गेले पाहिजे.

सार्वजनिक ठिकाणी तुमच्यावर ओरडून तुमची मानहानी करण्याचा अधिकार कोणालाही नाही. जर तुमचा जोडीदार मित्रमंडळींसमोर तुमच्याशी चढ्या आवाजात बोलत असेल तर तुम्ही सावध झाले पाहिजे.

relationship
आपला पती जगातला सर्वात 'सेक्सी पुरुष' ऐकल्यावर पत्नी म्हणाली...

जेव्हा दोन्ही जोडीदार एकमेकांना समजून घेतात व एकमेकांच्या विचारांचा आदर करतात तेव्हा ते एका चांगल्या नात्याचे लक्षण असते. मात्र जेव्हा तुमचा जोडीदार सतत टोमणे मारत असतो तेव्हा तो तुम्हाला कमी लेखून आपला अधिकार गाजवू पाहात असतो.

प्रत्येकवेळी तुम्हाला तुमची बाजू चुकीची नाही हे समजावून सांगण्यासाठी जोडीदाराला स्पष्टीकरण द्यावे लागत असेल तर तुमचा त्याच्याशी सकारात्मक संवाद राहिलेला नाही. यालाच मानसिक शोषण म्हणतात. तुमची कृती योग्य असल्याचे जोडीदाराला सतत पटवून द्यावे लागत असेल तर तुम्ही नैराश्याला बळी पडू शकता. बचावात्मक धोरण अवलंबण्याऐवजी तुम्ही जोडीदाराशी मोकळेपणाने बोलणे आवश्यक असते. मानसिक शोषणाची लक्षणे वेळीच ओळखल्यास त्यावर मात करणे शक्य होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.