सतत ड्रायव्हिंग करताय मग या संधी पाहून गाडीतच करा Stretching

how to relax while driving: अनेक तास ड्रायव्हिंग करतानाही शरीराला आराम मिळावा तसं शरीराच्या कोणत्याही समस्या निर्माण होवू नये यासाठी आम्ही तुम्हाला काही पर्याय सांगणार आहोत
how to relax while driving
how to relax while drivingEsakal
Updated on

अनेकांना कामामुळे सतत ड्रायव्हिंग Driving करावं लागतं. तर काहीजणांना स्वत: ड्राइव्ह करत वेगवेगळ्या ठिकाणांना भेट द्यायला आवडते. तसंच भारतातील India अनेक बड्या शहरांमध्ये ट्राफिक आणि खराब रस्त्यांच्या समस्येमुळे तासनतास गाडीमध्येच जातात. Relaxation Tips in Marathi How to make Stretching while Driving

अशा विविध कारणांमुळे सलग अनेक तास ड्राइव्ह केल्याने म्हणजेच गाडी चालवल्याने Driving एकाच जागी बसून आरोग्याच्या Health काही समस्या निर्माण होवू शकतात. सलग अनेक तास गाडी चालवल्याने पाठ, कंबर तसंच खांदे आणि मानेच्या समस्या निर्माण होवू शकतात.

कदाचित एक दिवस जास्त वेळ गाडी चालवल्याने तुम्हाला फारसा त्रास जाणवणार नाही. मात्र ज्यांना सतत ऑफिसला ये-जा करण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी जास्त तासांसाठी ड्रायव्हिंग करावं लागतं अशांना भविष्यात काही समस्या निर्माण होवू शकतात

अनेक तास ड्रायव्हिंग करतानाही शरीराला आराम मिळावा तसं शरीराच्या कोणत्याही समस्या निर्माण होवू नये यासाठी आम्ही तुम्हाला काही पर्याय सांगणार आहोत.

स्ट्रेचिंग एक्सरसाइज

जर तुम्ही ट्राफिकमध्ये अडकला आहात तर अगदी २ मिनिटांसाठी देखील तुम्ही कारमध्येच बसून स्ट्रेचिंग करू शकता. यासाठी स्टेअरिंगवर हात ताणून धरून पाठीचा कणा ताठ करा आणि दीर्घ श्वास घ्या. यामुळे पाठीला आराम मिळेल. तसचं जर खूप जास्त ट्राफिक असेल तर गाडीतून उतरून तुम्ही थोडी पायांची स्ट्रेचिंगही करू शकता.

त्याच प्रमाणे मान गोलाकार आणि वर खाली करून मानेचं स्ट्रेचिंग करू शकता. त्यातप्रमाणे दोन्ही हात दुमडून खांदे गोलाकार फिरवून शोल्डर रोटेशन केल्याने खांद्यांना आराम मिळेल. लॉन्ग ड्राइव्ह करत असतानाही थोडा वेळ गाडी बाजुला उभी करून तुम्ही ही स्ट्रेचिंग करू शकता.

हे देखिल वाचा-

how to relax while driving
Driving Tips: ड्रायव्हिंग करत असताना या गोष्टींची घ्या काळजी, धोका टळेल

मेडिटेशन

ड्रायव्हिंग करण्यासाठी एकाग्रता महत्वाची आहे. जर तुम्ही एखाद्या दूरच्या प्रवासासाठी निघत असाल तर मेडिटेशन नक्की करा किंवा प्रवासादरम्यान मध्ये मध्ये विश्रांती घेऊन गाडीत बसूनच काही मिनिटांसाठी मेडिटेशन करा. डोळे बंद करून ताठ बसून मन एका जागी केंद्रित करा. मेडिटेशन केल्याने मन शांत होईल आणि तुमची एकाग्रता वाढेल.

ब्रिदिंग एक्सरसाइज

सतत गाडी चालवल्याने अनेकदा थकवा जाणवतो. यामुळे गाडी चालवताना त्याचा परिणाम एकाग्रतेवर होवू शकतो. यासाठीच ट्राफिकमध्ये गाडी थांबलेली असताना किंवा शक्य तिथे काही मिनिटांसाठी श्वासाचे व्यायाम करा. डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या.

दोन्ही खांद्यांकडे पहात म्हणजेच उजव्या आणि डाव्या बाजुला पाहून दीर्घ श्वासोच्छवास करा. यामुळे आराम जाणवेल.

अनुलोम विलोम

जर तुम्हाला ड्रायव्हिंग केल्याने खूप थकवा जाणवत असेल तर तुम्ही अनुलोम विलोम करू शकता. यामुळे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढल्याने फ्रेश वाटतं. तसचं मेंदूलाही ऑक्सिजनचा पुरवठा वाढल्याने थकवा दूर होवून पुन्हा मूड ताजा होतो.

यासोबतच तुम्ही ड्रायव्हिंग करत असताना शक्य तेव्हा संधी पाहून हाताची किंवा पायाची तसंच पाठीची स्ट्रेचिंग केल्यास शरीराला आराम मिळेल शिवाय यामुळे नंतर काही समस्या उद्भवणार नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.