काही लोक सकाळी लवकर यासाठी उठतात की त्यांना टॉयलेटमध्ये जास्तवेळ बसावं लागतं. अनेक वेळ त्यांना तळमळत बसावं लागतं. तरीदेखील पोट साफ होत नाही. या गोष्टीची लोकांना इतकी सवय होते की त्यांना तो त्रास आहे असं वाटतच नाही.
काही लोक यावर उपाय करतात तो तात्पुरता. पण नंतर पुन्हा त्रास झाला की तो मुळव्याधासारख्या गंभीर आजाराकडे आपल्याला घेऊन जातो.
जर तुम्हाला या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्हाला तुमची जीवनशैली बदलावी लागेल. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी देखील बदलाव्या लागतील. चला जाणून घेऊया बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत.
फायबरयुक्त पदार्थ पोटासाठी उत्कृष्ट मानले जातात, कारण त्याच्या मदतीने ते पचन सुधारते. जर तुम्ही 30 ते 35 ग्रॅम या प्रमाणात दिवसभरात पोषक तत्वाचे सेवन केले. तर तुम्हाला बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. तसेच तुमचा वेळ टॉयलेटमध्ये कमी अन् इतर कामात जास्त वापरता येईल.
दही
दह्याचा प्रभाव थंड असतो. आणि ते आपल्या पोटासाठी खूप फायदेशीर मानले जाते. जेव्हा आपल्या पोटात चांगले बॅक्टेरिया येतात तेव्हाच बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल. या पदार्थात प्रोबायोटिक आढळते जे पचनास मदत करते. ज्यांची पचनक्रिया चांगली नाही अशा लोकांनी दही खावे.
त्रिफळा
त्रिफळा हा आयुर्वेदाचा खजिना मानला जातो. हिरडा, बेहडा, आवळा यांच्या मिश्रणापासून त्रिफळा चूर्ण तयार केले जाते. कोमट पाण्यात त्रिफळा चूर्णाची गोळी मिसळून रात्री झोपण्यापूर्वी प्यायल्यास सकाळी पोट साफ होण्यास मदत होते.
लिंबू पाणी
लिंबू पाणी प्यायल्याने आपल्याला आराम मिळतो, कारण यामुळे शरीराला थंडावा तर मिळतोच पण शरीरातील विषारी पदार्थही बाहेर पडतात. पोटाचा त्रास जाणवत असल्यास एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस पिळून त्यात मध टाकून प्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.