Republic Day 2024 : राजपथावर महात्मा गांधीचा चित्ररथ ठरलेला वादग्रस्त, महिलांच्या ब्लाऊजसंदर्भात केलेली ही चूक

महिलांचे असे चित्रण केल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या होत्या
Republic Day 2024
Republic Day 2024 esakal
Updated on

Republic Day 2024 :

भारताचा राष्ट्रीय सण म्हणजे देशाचा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. दोनच दिवसावर भारताचा प्रजासत्ताक दिन आला आहे. भारतासाठी हा दिवस एखाद्या उत्सवापेक्षा कमी नाही. त्यामुळे सर्वच नागरिक यादिवशी वेगवेगळ्या गोष्टी करून आनंद व्यक्त करत असतात.  

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर देशातील विविध राज्यांचे चित्ररथ सादर केले जातात. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये अनेक गोष्टी नव्या पहायला मिळतात. प्रत्येक राज्यातील वेगवेगळ्या गोष्टींवर सादर होणाऱ्या चित्ररथांमध्ये एक चित्ररथ असा होता, ज्याने वाद निर्माण झाला होता. ही २०१९ सालाची गोष्ट आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये एकूण 16 राज्यांची झलक राजपथावर दिसली. मात्र याच दरम्यान तामिळनाडूच्या झांकीवरून वाद सुरू झाला आहे.

Republic Day 2024
Republic Day : राज्याचा देशात डंका! महाराष्ट्राच्या चित्ररथाचा देशात दूसरा क्रमांक

तामिळनाडूमधील मदुराई येथे महात्मा गांधी यांनी भेट दिली होती. तिथले शेतकरी शरीर झाकण्यासाठी केवळ धोतराचा वापर करायचे. तेथील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था पाहून त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला होता. महात्मा गांधी यांनीही आयुष्यभर धोतर नेसण्याचा निर्णय इथूनच केला. तामिळनाडूतील हात प्रसंग, तिथल्या शेतकरी महिला यांच्यावर हा चित्ररथ साकारण्यात आला होता. पण हा रथ साकारताना एक मोठी चूक झाल्याने त्यावर टिका करण्यात आली होती.

तामिळनाडू राज्यात महिलांना ब्लाउज शिवाय साडी घातली असल्याचे दाखवण्यात आले होते. या संपूर्ण रथावर शेतकरी असून महात्मा गांधीजीचा पुतळाही होता. तिथल्या शेतकऱ्यांची कामे, जीवन यांचे सविस्तर चित्रण दाखवणारा हा रथ होता.

Republic Day 2024
Republic Day Fashion : प्रजासत्ताक दिनाला काय घालायचं असा प्रश्न पडलाय? या अभिनेत्रींचे लुक्स करा ट्राय

काय होती चूक

तर चूक अशी होती की, या भेटीनंतर महात्मा गांधींनी फक्त धोतर घालण्याचा निर्णय घेतला होता. महात्मा गांधी आणि तामिळनाडूसाठी ही एक महत्त्वाची घटना होती, परंतु 1921 मध्ये महिलांनी चित्रात दाखवल्याप्रमाणे कपडे घातले नाहीत. तेव्हाच्या महिला या पूर्ण वेषात असायच्या. त्यामुळे तामिळनाडूतल्या महिलांचे असे चित्रण केल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या होत्या.

Republic Day 2024
Republic Day Fashion : प्रजासत्ताक दिनाला पांढरा ड्रेस परिधान करायचा आहे? मग, अभिनेत्रींच्या ‘या’ लूक्सपासून घ्या प्रेरणा

१९ चे शतक

मुद्दा असा होता की, तामिळनाडू महिलांना ब्लाउज घालण्यावरची बंदी 19व्या शतकातच रद्द करण्यात आली होती. जेव्हा महात्मा गांधी आणि शेतकऱ्यांची भेट झाली तेव्हा त्या काळातील महिला संपूर्ण वस्त्र परिधान करायच्या. पण, या चित्ररथात हे दाखवण्यात आल्याने याला टिकेला सामोरे जावे लागले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.