Republic Day Fashion : प्रजासत्ताक दिनाला काय घालायचं असा प्रश्न पडलाय? या अभिनेत्रींचे लुक्स करा ट्राय

आज आम्ही तुम्हाला असेच काही खास आऊटफिट सांगणार आहोत. जे तुम्ही प्रजासत्ताक दिनानिमित्त परिधान करु शकता.
Republic Day Fashion : प्रजासत्ताक दिनाला काय घालायचं असा प्रश्न पडलाय? या अभिनेत्रींचे लुक्स करा ट्राय
Updated on

दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन भारताच्या कानाकोपऱ्यात साजरा केला जातो. या खास दिवसाला आणखी खास बनवण्यासाठी प्रत्येकजण तिरंग्याच्या रंगात सजलेला दिसत असतो. विशेषतः जर आपण महिलांबद्दल बोललो तर प्रजासत्ताक दिनी त्या खूप वेगळ्या पद्धतीने तयार होतात. 

या दिवशी काय परिधान करावं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. पण, आज आम्ही तुम्हाला असेच काही खास आऊटफिट सांगणार आहोत. जे तुम्ही प्रजासत्ताक दिनानिमित्त परिधान करु शकता. तर विद्या बालन, सारा अली खान, अशा अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची ड्रेसिंग स्टाइल तुम्ही कॅरी करू शकता.

विद्या बालनचा एथनिक लूक:

विद्या बालन साडीमध्ये खूपच सुंदर दिसते. विद्या बालनची ही स्टाईल तुम्ही या प्रजासत्ताक दिनी ट्राय करू शकता. यामध्ये विद्या बालनने पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे. साडीची लाल बॉर्डर साडीचे सौंदर्य वाढवत आहे. तिने कानात खूप सुंदर कानातले घातले आहेत आणि तिच्या कपाळावर काळी टिकली आणि लाल लिपस्टिक तिचा लुक पूर्ण करत आहे.

Republic Day Fashion : प्रजासत्ताक दिनाला काय घालायचं असा प्रश्न पडलाय? या अभिनेत्रींचे लुक्स करा ट्राय
Republic Day Look : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी असं व्हा तयार, मेकअपमधून दाखवा देशभक्तीची झलक

लाल साडीत काजोल सुंदर दिसत आहे:

काजोलची साडी नेसण्याची स्टाईल खरोखरच सुंदर आहे. या फोटोमध्ये काजोलने स्प्रेंगीटी ब्लाउजसोबत साधी साडी नेसली आहे. साडीच्या बाजूला सोनेरी लेस आहे ज्यामुळे ती आणखी सुंदर होत आहे. काजोलने हेवी नेकलेस आणि झुमके घातले आहे. यासोबत तिने मरून रंगाची टिकली लावली आहे.

प्रजासत्ताक दिनी सारा अली खानसारखा पांढरा सूट परिधान करता येईल. सूटमध्ये लेस डिटेलिंग आहे आणि फुलांच्या लेस बॉर्डरसह कॉटनचा दुपट्टा आहे. साराने हलका मेकअप केला असून कानात चांदीचे झुमके घातले आहेत. साराने आपले केस उघडे ठेवण्याऐवजी ते बांधून वेगळा लूक केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.