Beauty Pageants : मानुषी छिल्लर 2017 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यापासून नेहमीच चर्चेत असते. मिस वर्ल्ड जिंकल्यानंतर मानुषीने अनेक नामांकित ब्रँडसाठी मॉडेलिंग केले आणि सम्राट पृथ्वीराज या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मानुषी छिल्लर आजकाल जागतिक ब्रँड एस्टी लॉडरची ब्रँड अॅम्बेसेडर बनल्यामुळे चर्चेत आहे.
या यशाबद्दल, मानुषीने 21 व्या शतकात सौंदर्याचा अर्थ कसा बदलत आहे आणि एस्टी लॉडरसोबतचा तिचा नवीन प्रवास कसा आहे याबद्दल एनडीटीव्हीशी गप्पा मारल्या होत्या. यादरम्यान तिने आपल्या सौंदर्य स्पर्धेतील अनुभव आणि त्यात सहभागी होण्यासाठी काय आवश्यक आहे याबद्दल देखील चर्चा केली. हीच चर्चा आजच्या लेखात आपण बघणार आहोत.
मानुषी छिल्लर म्हणाली की, आता सौंदर्याचा अर्थ बदलला आहे. आता केवळ दिखावा करून भागत नाही, तर इतर अनेक घटक आहेत ज्यांवर काम करणे आवश्यक आहे. खरे सौंदर्य मनातून येते आणि याचा अनुभव मी स्पर्धेत घेतला आहे. यातून तुम्हाला आत्मविश्वास आणि सकारात्मकता मिळते ज्यामुळे तुम्ही स्वतःला लोकांसमोर चांगल्या प्रकारे मांडू शकता.
स्वतःची, स्वतः च्या केसांची, त्वचेच्या सौंदर्याची काळजी घेण्यासोबतच तुम्हाला दयाळूपणा, करुणा, सहानुभूती आणि सकारात्मकता यासारख्या आंतरिक गुणांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. यातूनच तुम्ही सुंदर ठरता. मानुषी म्हणते की, सौंदर्याकडे पाहण्याचा हा दृष्टीकोन आज मी माझ्यासोबत आणला आहे आणि इतरांनाही शेअर केलाय.
दुसरीकडे, मानुषी छिल्लर भारतीय सौंदर्याच्या क्षेत्रात होत असलेल्या बदलांबद्दल सांगताना म्हणाली की, आजकाल माझ्या लक्षात आलेला एक बदल म्हणजे त्वचेच्या काळजीबद्दल लोकांमध्ये असलेली जागरूकता. लोक आता सकाळ आणि रात्रीच्या त्वचेची काळजी घेण्याकडे खूप लक्ष देत आहेत.
ज्यामध्ये क्लीनिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग आणि सनस्क्रीन वापरले जात आहे. तसेच, त्वचेची काळजी घेणे म्हणजे केवळ चांगले दिसणे नाही, तर त्वचेच्या आरोग्याची काळजी घेणे देखील आहे हे लोकांना समजणे आवश्यक आहे. ती पुढे म्हणते की स्किनकेअरला प्राधान्य देऊन लोक त्वचेच्या समस्या टाळू शकतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.