Research on Aging : स्त्रियांपेक्षा खरंच लवकर वयस्कर दिसतात पुरुष? संशोधन सांगतं...

एका संशोधनात असं समोर आलंय की पुरुष महिलांपेक्षा जास्त वयस्कर दिसतात.
Research on Aging
Research on Agingsakal
Updated on

Research on Aging : असं म्हणतात की मुली लवकर वयात येतात. मुलींची बौद्धिक क्षमता, शारीरीक घडणमध्ये लवकर बदल दिसून येतात. या तुलनेत मात्र पुरुषांमध्ये असे बदल फार दिसून येत नाही.

मात्र एका संशोधनात असं समोर आलंय की  पुरुष महिलांपेक्षा जास्त वयस्कर दिसतात. जरी स्त्री व पुरुष एकाच वयाचे असले तरी पुरुष प्रौढ वयात स्त्रीपेक्षा लवकर वयस्कर दिसतात. (men look older than women research said)

Research on Aging
Romantic Women : पुरुषांपेक्षा महिला जास्त रोमँटीक का असतात?

फिनलँडच्या एका विद्यापीठाने केलेल्या रिसर्चमध्ये सांगण्यात आलंय की स्त्रियांपेक्षा पुरुष लवकर वयस्कर दिसतात. या रिसर्चमध्ये 50 वर्षाच्या पुरुष आणि स्त्रीचं उदाहरण देण्यात आलंय. 50 वर्षांचा पुरुष व स्त्री या दोघांमध्ये जास्त वयस्कर हा पुरुष दिसतो.

म्हणजेच जवळपास चार किंवा पाच वर्ष पुरुष वयस्कर दिसतोय. यामागे या संशोधनात असं का होतं, याची कारणे सुद्धा स्पष्ट केली आहे. उदा. ताण-तणाव, धूम्रपान, आरोग्याकडे दुर्लक्ष, इत्यादी.

Research on Aging
World Men's Day : भारतासह जगाच्या पाठीवरील मोस्ट पॉवरफुल पुरूष

विशेष म्हणजे या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी एपिजेनेटिक क्लॉकचा वापर केलाय. याद्वारे व्यक्तींचं बायमेट्रीक वय किती असावं, हे सांगितले जाते. संशोधनाच्या मते पुरुषांचं वय जास्त दिसणे हे वयाच्या 20 व्या वर्षापासूनच सुरू होतं. त्यामुळे मुली लवकर वयात येतात हा समज खरा आहे की खोटा, यावर प्रश्वचिन्ह निर्माण होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.