Monsoon Care Tips: पावसाळ्यात वाढू शकतो 'लेप्टोस्पायरोसिस’ चा धोका, वेळीच व्हा सावध

Leptospirosis: पावसाळ्यात ‘लेप्टोस्पायरोसिस’ या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. परंतु, याची लक्षणे सर्वसामान्य आजारासारखीच असल्याने, अनेकांना आपल्याला हा आजार झाला आहे, हेच माहिती नसते.
Leptospirosis
LeptospirosisSakal
Updated on

पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचते. यात जाण्याचा मोह आवरणे कठीण असते. परंतु, यात गेल्यास ‘लेप्टोस्पायरोसिस’ हा आजार होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे साचलेल्या पाण्यात जाताना काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

पावसाळ्यात ‘लेप्टोस्पायरोसिस’ या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. परंतु, याची लक्षणे सर्वसामान्य आजारासारखीच असल्याने, अनेकांना आपल्याला हा आजार झाला आहे, हेच माहिती नसते. लेप्टोस्पायरोसिस हा बॅक्टेरियापासून होणारा आजार आहे. आजाराने बाधित कुत्रा, मांजर, गुरेढोरे यांसारख्या चतुष्पाद प्राण्यांचे मूत्रातून लेप्टोस्पायरोसिसचे विषाणू पाणी, चिखलात मिसळतात. आपल्याला एखादी जखम झाल्यास अशा दूषित पाण्याच्या आपण संपर्कात आल्यास, हा आजार होण्याची शक्यता अधिक असते.

काय आहेत लक्षणे?

जास्त ताप

डोकेदुखी

थंडी वाजणे

मळमळ

उलटी

पोटात दुखणे

स्किनवर रॅश

डोळ्यात पिवळेपणा जाणवणे

खांदे दुखणे

अशी घ्या काळजी

डिटर्जंटच्या वापरामुळे हा बॅक्टेरिया मरतो. यामुळे स्वच्छतेसाठी त्याचा वापर करावा. याची काळजी घ्या.

खिडक्यांना जाळी बसवा.

शरीर पूर्ण झाकेल असे कपडे घाला.

हातपाय साबणाने स्वच्छ धुवावे. जखम असल्यास पाण्यात जाणे टाळावे.

घराचा परिसर स्वच्छ करताना ब्लिच किंवा फिनेल वापरावे.

पाळीव प्राणी असल्यास लसीकरण करून घ्यावे.

किडनी, यकृत निकामी होण्याचा धोका

Leptospirosis
Guru Purnima 2024: अशी करा यंदाची गुरुपौर्णिमा साजरी, जाणून घ्या संपुर्ण विधी

या आजारात अँटिबायोटिक घेतल्यानंतर फरक पडतो. काही वेळा रुग्णाला रुग्णालयात दाखल करून उपचार करण्याचीही वेळ येते. हा आजार बळावल्यास गंभीर रुग्णांत किडनी किंवा यकृत निकामी होण्याचा धोका अधिक असतो.

साचलेल्या पाण्यात जाणे टाळावे, काळजी घ्यावी. प्राण्यांचे लसीकरण करावे, या आजारात जास्त ताप, थंडी वाजणे, मळमळ, उलटी, पोट दुखणे अशी लक्षणे असतात. पावसाळयात या आजाराचे रुग्ण वाढतात. त्यामुळे लक्षणे जाणवल्यास योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. प्रतिमा भाले, त्वचारोग, सौंदर्यतज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()