आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की गुलाब पाणी हे एक सौंदर्य उत्पादन आहे जे प्राचीन काळापासून त्वचेची काळजी घेण्यासाठी समाविष्ट केले गेले आहे. गुलाब पाणी हे परवडणारे तसेच त्वचेसाठी बेस्ट आहे. आज आम्ही तुमच्यासाठी स्पॉटलेस स्किन फेसपॅक बनवण्याची एक पद्धत घेऊन आलो आहोत.
गुलाबपाणी आपली त्वचा उन्हाळ्यात हायड्रेट ठेवते. तुमची त्वचा यामुळे मुलायम राहते. आपल्या त्वचेवरील या फेसपॅकच्या वापराने मुरुम, गडद डाग किंवा पिग्मेंटेशन सारखे डाग पूर्णपणे गायब होऊ लागतात. एवढंच नाही तर आपल्या त्वचेवरील डेड स्किन आणि साचलेली घाण काढून टाकण्यास देखील मदत करते.
फेसपॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य
१ चमचा गुलाब पाणी
१ चमचा संत्र्याची साल पावडर
१ चमचा मध
फेस पॅक कसा बनवावा?
सगळ्यात पाहिलं स्पॉटलेस स्किन फेसपॅक तयार करण्यासाठी, एक छोटी वाटी घ्या.
त्यानंतर त्यामध्ये १ चमचा गुलाबजल, संत्र्याची साल पावडर आणि १ चमचा मध घाला.
तुम्ही या सर्व गोष्टी यानंतर व्यवस्थित मिसळा.
आता स्पॉटलेस स्किन फेसपॅक तयार आहे.
स्पॉटलेस स्किन फेसपॅक कसा लावावा?
फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा पहिलं धुवा.
त्यानंतर तयार फेसपॅकचा थोडासा भाग बोटावर घेऊन चेहऱ्यावर लावा.
यानंतर पॅक चांगले कोरडे होण्यासाठी थोडावेळ सोडा.
नॉर्मल पाण्याने नंतर चेहरा धुवून स्वच्छ करावा.
यानंतर चेहऱ्यावर एलोवेरा जेल किंवा मॉइश्चरायझर लावा.
आठवड्यातून 3 वेळा सकाळी आणि संध्याकाळी हा पॅक लावा.
तुमच्या त्वचेवरील डाग यामुळे कमी होतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.