Rose Water For Skin : उन्हाळा हा सर्वांसाठी खडतर ऋतू असतो. शेतकऱ्यांपासून प्राणी-पशू यांच्यासाठीही, मग मानव यातून कसा सुटू शकेल? उन्हाळ्यात मानवी शरीरासमोर अनेक आव्हाने असतात. त्यातील सर्वांत मोठे आव्हान म्हणजे त्वचेची काळजी. त्वचेकडे अजूनही आपण डोळसपणे पाहात नसल्याचे वेळोवेळी जाणवते. परंतु, अगदी घरगुती पण सुरक्षित उपायांच्या साहाय्याने उन्हाळ्यात त्वचा सतेज आणि निरोगी राखण्यास मदत होऊ शकते.
उन्हाळ्यातील काळजीसाठी गुलाब पाणी हे एक उत्पादन आहे जे प्राचीन काळापासून सौंदर्यासाठी वापरले जात आहे.गुलाब जल स्वस्त तसेच त्वचेसाठी फायदेशीर आहे. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी गुलाबपाण्याचे बर्फाचे तुकडे बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. उन्हाळ्यात गुलाबपाणी आपली त्वचा हायड्रेट ठेवते.
यामुळे तुमची त्वचा सॉफ्ट राहते. त्याचबरोबर गुलाब पाण्याच्या वापरामुळे आपल्या त्वचेवरील मृत त्वचा आणि साचलेली घाण काढून टाकण्यास मदत होते. गुलाब पाण्याच्या बर्फाचे तुकडे आपल्या त्वचेला झटपट ताजेतवाने वाटतात, तर चला जाणून घेऊया गुलाब पाण्याच्या बर्फाचे तुकडे कसे बनवायचे.
गुलाबजल आइस क्युबसाठी लागणारे साहित्य
गुलाब जल
गुलाबाच्या पाकळ्या
फ्रिजरमधील बर्फाचा ट्रे
कसे बनवायचे Rose Ice Cube
गुलाबजल आइस क्यूब बनविण्यासाठी, आपण प्रथम एक वाटी घ्या.
मग त्यात गुलाबजल आणि गुलाबाच्या पाकळ्या घ्या.
मग ही पाने गुलाबपाण्यात घालून मिक्स करा.
यानंतर हे मिश्रण बर्फाच्या ट्रेमध्ये भरून घ्या.
मग फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये ठेवा.
आता तुमचे गुलाबपाण्याचे बर्फाचे तुकडे तयार आहेत.
त्यानंतर तयार झालेले तुकडे स्वच्छ चेहऱ्यावर लावून मसाज करा.
तुम्ही थोडे गुलाबजल आणि गुलाबाच्या पाकळ्या मिक्सरला बारीक करूनही वापरू शकता. किंवा आधी गुलाबाच्या पाकळ्यांची पेस्ट बनवून त्यात गुलाबजल घालू शकता.
हे Ice Cube चेहऱ्याला लावण्याचे फायदे
सनबर्न- सनबर्नची समस्या तीव्र सूर्यप्रकाशात सुरू होते. अशावेळी बाहेर जाण्यापूर्वी या क्यूबने चेहऱ्याला मसाज करा. यामुळे सनबर्न होणार नाही.
सुरकुत्या दूर करा - जर तुम्हाला डोळ्यांभोवती सुरकुत्या आल्याने त्रास होत असेल तर हे क्युब्स उपयोगी आहेत. आईस क्यूब चेहऱ्यावर हलक्या हाताने 15 सेकंद फिरवत रहा.
काळ्या वर्तुळांपासून सुटका - जर तुम्ही काळ्या वर्तुळाच्या समस्येने त्रस्त असाल तर हे क्यूब रोज लावा. असे नियमित केल्याने काळी वर्तुळे दूर हळूहळू दूर होतील.
उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी
- उन्हाळ्यात दिवसातून दोनदा चेहरा पाण्याने चांगला धुतला गेला पाहिजे. तुम्ही दिवसभर घरातच राहात असला तरीही चेहऱ्याची त्वचा चांगली राहण्यासाठी हे खूप गरजेचे आहे. त्यामुळे या उन्हाळ्यामध्ये झोपण्याआधी चेहरा धुणे कधीही विसरू नका.
- सनस्क्रीनच्या वापराविषयी सर्वांच्या मनात नेहमीच संभ्रम असतो. जर त्वचेवर मुरूम सतत येत असतील तर जेल बेस असलेले सनस्क्रीन वापरावे तर कोरडी त्वचा असणाऱ्यांनी क्रीम बेस असलेले सनस्क्रीन वापरावे.
- सनस्क्रीन निवडताना योग्य सनस्क्रीनची निवड ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. काही सनस्क्रीन त्वचेवर रासायनिक कवच देते तर काही सनस्क्रीन त्वचेवर पसरून एक प्रकारचे फिजिकल बॅरिअर तयार करते. कुठल्याही सनस्क्रीनवर SPF म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर दिलेला असतो.
- त्वचेच्या दृष्टीने या ऋतूत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहार. उन्हाळ्यात अधिक शाकाहार घेणे योग्य तसेच फळांचे सेवनही फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात पाण्याची भूमिका संजीवनीची असते. त्यामुळे, अधिकाधिक पाणी पिऊन शरीराचे संतुलन राखता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.