फॅशनमध्ये प्रिंट आणि डिझाइन अत्यंत महत्त्वाचे ठरते. टॉपमध्ये प्रामुख्याने टी-शर्ट आणि शर्ट असे दोन भाग पडतात. शर्ट म्हटल्यावर लगेचच ऑफिसचा लुक डोळ्यासमोर येतो. परंतु, शर्टची व्याख्या आता बदलते आहे. इतरवेळी, बाहेरही हे शर्ट घालता येऊ शकतात. मधल्या काळात ‘फ्लोरल प्रिंट’ची खूप चलती होती. फ्लोरल प्रिंटचे शर्ट ही कधीही करता येऊ शकणारी फॅशन आहे. जाणून घेऊया फ्लोरल प्रिंट शर्टविषयी....
फ्लोरल प्रिंट शर्ट
फ्लोरल प्रिंट म्हणजेच फुलांची, पानांची, रंगीत-संगीत अशी प्रिंट. या प्रिंटचे शर्ट ऑफिस किंवा फॉर्मलव्यतिरिक्तही वापरता येतात. या प्रकारचे शर्ट फक्त उन्हाळ्यात वापरण्याची फॅशन होती. मात्र, आता चित्र तसे राहिले नसून, कोणत्याही सीझनमध्ये आणि कुठेही वापरता येतील अशी फॅशन आली आहे. या प्रकारातील शर्ट कोणालाही शोभून दिसणारे आहेत. असंख्य प्रकार, रंग आणि डिझाइन या शर्टांमध्ये पाहायला मिळतात.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
- फ्लोरल प्रिंट ही खूप नाजूक आणि साधी आहे. इतर कोणत्याही प्रकारासारखी ती भरजरी नाही. यामधील रंग हे सहसा ‘पेस्टल’ अर्थात हलके असतात.
- ऑफिस, फिरायला जाताना, कॉलेज, आउटिंग आणि अशा अनेक ठिकाणी हे शर्ट घालता येतात. नेहमीच्या शर्टला हटके पर्याय आहे.
- शर्टही घालता येतो आणि त्याचसोबत क्लासिक लुकही मिळवता येतो.
- या प्रिंटमुळे तुम्ही अतिबारिक किंवा जाडही दिसत नाही. हे शर्ट सहसा हलके, सळसळीत असतात. रंग आणि प्रिंटमध्ये असंख्य प्रकार असल्याने कोणालाही शोभून दिसतात.
- हे शर्ट घालताना बॉटम्स शक्यतो प्लेन वापरा. शर्टची प्रिंट फुलांची असल्याने ती लक्षवेधी असते. पॅंट प्लेनच असावी, त्यामुळे संपूर्ण लुक जुळून येईल. जीन्स, पांढरी पॅंट, पॅरेलल पॅंट, प्लाझो, डेनिम स्कर्ट, प्लेन स्कर्ट असे काही पर्याय आहेत.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
- अॅक्सेसरीजमध्ये मोठे गळ्यातले किंवा कानातले टाळा. अशाप्रकारच्या प्रिंटवर नाजूक कानातले आणि बारीक चैन शोभून दिसते. बॅग लहान आणि गडद रंगाची घ्या. केसासोबत प्रयोग न करता नेहमीप्रमाणे मोकळे सोडा किंवा बन बांधा. हा संपूर्ण पेहराव लक्षवेधी लुक देईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.