फॅशन-टॅशन : चर्चा फक्त ओढणीचीच! 

फॅशन-टॅशन : चर्चा फक्त ओढणीचीच! 
Updated on

गणेशोत्सव वर्षातील सर्वांत मोठ्या सणांपैकी एक. गणेशोत्सवासोबतच गौरीचे आगमनही होते. तसे पाहायला गेले तर, सणांची एक मोठी मालिकाच सुरू होते. सण कोणताही असो, त्यासाठी नटणे-थटणे हे ओघाने आलेच. प्रत्येक सणासाठी काय वेगळे घ्यायचे, कोणती वेगळी फॅशन करायची हा मोठा प्रश्‍न कायमच भेडसावत असतो. परंतु, आपल्याकडे असणाऱ्या किंवा साध्या काही समीकरणांसोबतच अनोखी फॅशन करता येऊ शकते. प्रत्येक सणाला साजेशा भरजरी ओढणीच्या फॅशनविषयी आपण जाणून घेणार आहोत. 

भरजरी ओढणी 
पहिल्यांदा पंजाबी, अनारकली, चुडीदार अशा ड्रेसचा संपूर्ण सेटची फॅशन होती. कालांतराने फॅशनमध्ये बदल होत गेले आणि त्याची जागा कुर्ती, पलाझो, ड्रेस यांनी घेतली. ओढणीची पारंपरिक फॅशन काहीशी मागेच पडली. परंतु, ड्रेसचा महत्त्वपूर्ण भाग असणारी ओढणी आता नव्या रूपात पाहायला मिळते. भरजरी ओढणीमध्ये साध्या किंवा रोजच्या ओढणीपेक्षा त्यावर डिझाईन, नक्षीकाम आणि भडक रंग पाहायला मिळतात. गेल्या काही वर्षांमध्ये भरजरी ओढणीची खास फॅशन पाहायला मिळते. साडीला किंवा खूप भरलेल्या ड्रेसला भरजरी ओढणीचा चांगला पर्याय होऊ शकतो. मग, यासोबत कशी फॅशन करायची? 

"फॅशन-पॅशन : एव्हरग्रीन पफ स्लिव्हज

- भरजरी ओढणीमध्ये असंख्य प्रकार पाहायला मिळतात. 
- नेट, राजस्थानी, मधूबन, बनारसी सिल्क, पॉम पॉम, चंदेरी, इकट, कलमकारी हे त्यातील काही मुख्य प्रकार आहेत. 
- त्यातील प्रकाराप्रमाणे कापड, डिझाईन आणि प्रिंट वेगवेगळे पाहायला मिळतात. तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये डिझाईन बघायला मिळेल. 
- मोठे प्रिंट, लटकन, पॉम पॉम, मोठी बॉर्डर, नेट, गोंडे अशांमुळेच ही ओढणी सर्वांपेक्षा वेगळी आहे. कोणत्या कार्यक्रमासाठी तुम्हाला ती वापरायची आहे त्यानुसार ती निवडावी. 
- फक्त कार्यक्रम, सण, उत्सव यासाठी ती मर्यादित नसून, इतरवेळीही वापरण्यासारखी आहे. 
- एकाच प्लेन रंगाचे कुर्ता-पॅंट व त्यावर ही भरजरी ओढणी तुम्हाला सर्वांपेक्षा वेगळा लुक देईल. 
- अखंड ड्रेस घेतल्यावर तो इतरवेळी वापरता येईलच याची शाश्वती नसते. अशावेळी कोणत्याही प्लेन कुर्ती आणि पलाझोसोबत ही ओढणी ट्रेंडी आणि भन्नाट लुक देईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.