निरोगी राहण्यासाठी सदगुरू नाश्त्यामध्ये या 2 पदार्थांचा करतात समावेश, शेअर केला VIDEO

Healthy Breakfast Tips by Sadhguru: निरोगी राहण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये सदगुरू या खाद्यपदार्थांचा समावेश करतात. याबाबतची माहिती देणारा व्हिडीओही त्यांनी शेअर केला आहे.
Healthy Breakfast News
Healthy Breakfast NewsSakal
Updated on

Health Care News : निरोगी जीवन जगण्यासाठी आहारामध्ये पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश करणं गरजेचं असते. योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेत खाणेपिणे केल्यास कित्येक आजारांच्या संसर्गाचा धोका टाळता येणे शक्य आहे. 

निरोगी राहण्यासाठी सदगुरू देखील हा नियम न चुकता पाळतात. नुकतेच त्यांनी स्वतःच्या हेल्दी ब्रेकफास्टची माहिती सांगणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सदगुरू यांनी सांगितले आहे की, मोड आलेल्या मुगासह ते मोड आलेले मेथीच्या दाण्यांचंही सेवन करतात. 

Healthy Breakfast News
Morning Walk Mistakes मॉर्निंग वॉकपूर्वी करू नका या 5 चुका, अन्यथा वाढतील शारीरिक समस्या

शिवाय या खाद्यपदार्थांच्या सेवनाचे फायदेही त्यांनी सांगितले आहेत. चला तर आपणही जाणून घेऊया मोड आलेले मूग-मेथीचे दाणे खाण्याचे फायदे...

नैसर्गिकरित्या रक्तशुद्धी होते

मोड आलेले मेथीचे दाणे खाल्ल्याने नैसर्गिक स्वरुपात रक्तशुद्धी होण्यास मदत मिळते. याशिवाय शरीरातील ऑक्सिजनचा प्रवाह देखील वाढतो. तसेच शरीरातील विषारी घटकही बाहेर फेकले जाण्यास मदत मिळते.

Healthy Breakfast News
Almond Dates Ladoo Benefits मुलांना खजूर-बदामाचे लाडू खायला द्या, जाणून घ्या फायदे व रेसिपी

पोषणतत्त्वांचा साठा 

मधुमेहग्रस्त रूग्णांना नियमित सकाळी मेथीच्या दाण्यांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. पण हे खाद्य सर्वांसाठीच फायदेशीर आहे. यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन आणि खनिजांची मात्रा मुबलक प्रमाणात असते. हे सर्व घटक आरोग्याकरिता लाभदायक असतात.

केस आणि त्वचेसाठी फायदेशीर

हेअर केअर रूटीनमध्ये मेथींच्या दाण्यांचा समावेश केल्यास केसगळतीची समस्या कमी होण्यास मदत मिळते. तसेच नियमित मेथीच्या दाण्यांचे सेवन केल्यास त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी यामुळे भरपूर फायदे मिळतात.

Healthy Breakfast News
Healthy Fats Benefits निरोगी राहायचं असेल तर डाएटमध्ये हेल्दी फॅट्सचा करा समावेश, ऋजुता दिवेकरने सांगितले फायदे
पचनप्रक्रिया सुधारते 

नियमित सकाळी रिकाम्या पोटी मोड आलेले मेथीचे दाणे खाल्ल्यास पचनप्रक्रियेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते. बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, पोट फुगणे इत्यादी पोटाशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत मिळते.

स्तन्यदा मातांसाठी लाभदायक

ब्रेस्ट फीड करणाऱ्या मातांनी मोड आलेले मेथीचे दाणे खाल्ल्यास फायदे मिळतील.

मोड आलेल्या मेथीचे कसे करावे सेवन

सदगुरू मोड आलेल्या मेथीच्या दाण्यांसह मोड आलेले मूगही खातात. यामध्येही मेथीच्या दाण्यांचे प्रमाण केवळ एक किंवा दोन चमचे एवढेच ठेवले जाते. यापेक्षा अधिक प्रमाणात मेथीचे दाणे खाल्ल्यास पोटाशी संबंधित समस्या वाढू शकतात आणि पचनप्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.  

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.