Safety Tips: मिरची कापतांना होणार नाही हातांची जळजळ, फक्त फॉलो करा 'या' टिप्स

Safety Tips: मिरची कापतांना हातांची जळजळ होत असेल तर पुढील टिप्स फॉलो करू शकता.
Safety Tips | how to cut chillies without burning your hands
Safety Tips | how to cut chillies without burning your handsSakal
Updated on

safety tips how to cut chillies without burning your hands

स्वंयपाकघरात काम करणे सोपे नाही. कांदा कापताना डोळ्यांमध्ये पाणी येण्यापासून ते मिरची कापताना हाताला जळजळ होण्यापर्यंत अनेक अवघड कामे करावी लागतात. मिरची चवीला तिखट असते. मिरचीचा वापर पोहे, उपमा, हिरवी चटणी यासारख्या अनेक पदार्थांमध्ये केला जातो. यामुळे मिरची कापताना हातात जळजळ होते. हात स्वच्छ धुतल्यानंतर देखील हातांची जळजळ कमी होत नाही. मिरची कापतांना पुढील गोष्टींची मदत घेऊ शकता.

  • हातमोजे वापरावे

मिरची कापताना हाणारी जळजळ कमी करायची असेल तर तुम्ही हातमोजे वापरू शकता. यानंतर चाकूच्या मदतीने मिरची कापावी. यामुळे मिरचीचा मसालेदारपणा हातांना लागणार नाही. मिरची कापून झाल्यावर हातमोजे नीट स्वच्छ करून ठेवावी. याचा तुमच्या त्वचेवर कोणताही परिणाम होणार नाही आणि कोणत्याही प्रकारची जळजळ होणार नाही.

  • प्लास्टिकचा वापर

जर तुमच्याकडे हातमोजे नसेल तर तुम्ही घरी सहज उपलब्ध असलेल्या प्लास्टिक पिशवीचा वापर करू शकता. मिरची कापण्यापूर्वी दोन्ही हातांमध्ये प्लास्टिक पिशवी बांधावी. यानंतर मिरची चाकूच्या मदतीने चिराव्या. यामुळे तुम्हाला तुमच्या हातात जळजळ जाणवणार नाही.

Safety Tips | how to cut chillies without burning your hands
Morning Tips: केसांमधील गुंता कमी होण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय
  • कात्री वापरावी

जर तुम्हाला तुमच्या हातावर हातमोजे किंवा प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करायचा नसेल तर मिरची कापण्यासाठी चाकूऐवजी कात्री वापरू शकता. यामुळे हाताची जळजळ होणार नाही. मिरचीच्या देठाला पकडून कात्रीच्या मदतीने सहज कापू शकता.

  • चॉपरचा वापर

जर तुम्हाला वरील कोणताही उपाय करायचा नसेल तर तुम्ही चॉपरचा वापर करू शकता. बाजारात अनेक प्रकारचे चॉपर मिळतात. त्याचा वापर करून मिरची कापू शकता. तुम्ही कमी वेळेत अनेक मिरच्या कापू शकता.

  • हाताची जळजळ कशी कमी करावी

  1. मिरची कापल्यावर हाताची जळजळ होत असेल तर कोरफड जेलचा वापर करावा.

  2. हाताची जळजळ कमी होण्यासाठी बर्फाचे तुकडे वापरू शकता.

  3. खोबरेल तेलाचा वापर करून देखील हाताची जळजळ कमी करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.