भारतात एकापेक्षा एक बॉडीबिल्डर्स आहेत. हल्ली मजबूत आणि अट्रॅक्टिव्ह बॉडी बनवण्यासाठी तरूण मंडळीही जिमखान्यात जाऊन कसरत करत असतात. भारतातील या वृद्धाची कहाणी जर का वाचल तर तुम्हीही चक्रावून जाल. १०३ वर्षाच्या या वृद्धाची बॉडी बघून तरूणांना हेवा वाटायचा. मनोहर ऐच हे भारतातील सगळ्यात वयस्कर बॉडीबिल्डर होते. २०१६ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. मात्र या बॉडीबिल्डरचे नवल वाटावे असे ते होते. (read once 103 year old young man diet)
मनोहर ऐच हे असं नाव आहे जे अनेकांना कदाचित माहिती नाही. मात्र मनोहर यांनी एशियन गेम्समध्ये तीन गोल्ड मेडल जिंकली होती. तसेच मिस्टर यूनिवर्सचा किताब जिकंणारे ते दुसरे भारतीय ठरले होते. मनोहर सिंपल डाएट घेणारे होते पण स्वत:च्या शरीराला त्यांनी अशा प्रकारे घडवलं होतं की, चांगले चांगले पहेलवान त्यांच्यासमोर फेल होते. म्हातारवयात सलमानसारखी डौलदार बॉडी असणे खरं तर कठीण आहे. त्यामुळे अशी बॉडी तुम्हालाही हवी असेल तर जाणून घ्या त्यांचा डाएट प्लान.
मनोहर एच यांचा जन्म १७ मार्च, १९१३ मध्ये कोमिला जिल्ह्यातील पुटिया गावात झाला होता. त्या काळी हे गाव ब्रिटीश भारताचा भाग होतं. आता हे गाव बांग्लादेशमध्ये येतं. एक स्टंटमॅन म्हणून मनोहर यांनी करियरला सुरूवात केली होती. पॉकेट हरक्यूलिसच्या नावाने ते प्रसिद्ध होते. दाताने स्टीलच्या सळाखी मोडत ते हजार पानांचं पुस्तक हाताने मोडायचे.
३९ वर्षांच्या वयात बॉडी बिल्डींगला सुरूवात केली आणि ज्यावेळी त्यांनी शेवटच्या बॉडी बिल्डींग काँपिटीशनमध्ये सहभाग घेतला तो ९० वर्षांचे असताना. मनोहर यांच्या डाएटबाबत बोलायचं झाल्यास ते भात, मासे, भाज्या, दाळ, फळे आणि दूध घेत होते. एक्झरसाईझ बाबत बोलायचं झाल्यास ते मॉर्डन एक्झरसाईज करणे टाळायचे. एकाच वेळी ते हजार पुशअप्स आणि उठ्ठक बैठक करायचे. सिंपल डाएट घेऊनही या वृद्धाची १०३ वर्षापर्यंत असणारी सलमानसारखी बॉडी बघून लोक चकित व्हायचे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.