Samudra Sashtra: अशा ठेवणीचे पायाचे तळवे असलेले लोक खूप भाग्यवान असतात

पायाचे तळवे काळे असलेल्या लोकांना आयुष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.
Samudra Sashtra
Samudra SashtraEsakal
Updated on

आपल्या शरीराची रचना ही आपल्या आयुष्यातील अनेक गुपिते उघड करत असते. माणसाच्या शरिराच्या ठेवणीवरून त्याचा स्वभाव, त्याचे वागणे आणि त्यांच्या भविष्याविषयी असंख्य संकेत कळतात. असा उल्लेख समुद्रशास्त्रात आढळतो.काही माणसाच्या हाताच्या आणि पायाच्या तळव्यावर ठराविक काही खुणा असतात, अशा काही खुणांना शुभ संकेत मानले जाते. 

Samudra Sashtra
Diwali Recipe: दिवाळी स्पेशल पारंपरिक पद्धतीने चंपाकळी कशी तयार करायची?

पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की पायाच्या तळव्यावरील विशेष चिन्ह हे माणसाची श्रीमंती आणि भाग्यवान असल्याचे संकेत दर्शवत असते. पायाच्या तळव्यावर असलेल्या बारीक बारीक खुणा या त्या माणसाशी संबंधित रहस्ये उलगडत असतात. 

चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊया पायाच्या तळव्यावर कोणते चिन्ह असणे शुभ असते.

Samudra Sashtra
Diwali Recipe: पातळ पोहे चिवडा कसा बनवायचा?

1) सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांच्या पायाचे तळवे अतिशय मऊ, गुळगुळीत असतात. असे लोक खूप भाग्यवान असतात. असे म्हणतात की मऊ, गुळगुळीत आणि लाल रंगाचे तळवे असलेल्या लोकांवर लक्ष्मी मातेची सदैव कृपादृष्टी राहते. अशा माणसांनि आयुष्यात कधीच पैशाची चणचण भासत नाही. 

Samudra Sashtra
Diwali Recipe: नाशिकचा खमंग चिवडा घरच्या घरी कसा तयार करायचा?

2) याशिवाय ज्या लोकांचे तळवे खूप सपाट असतात, ते लोक प्रचंड मेहनती असतात आणि मनाने देखील दिलखुलास  असतात. हे लोक इतरांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर  असतात.

3) ज्या लोकांच्या पायाच्या टाचा फुटलेल्या असतात किंवा पायाचे तळवे कोरडे पडलेले असतात अशा लोकांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. त्याच्या आयुष्यात नेहमीच आव्हाने असतात. यश मिळविण्यासाठी त्यांना कठोर परिश्रम करावे लागतात.

Samudra Sashtra
Diwali Recipe: नाशिकचा खमंग चिवडा घरच्या घरी कसा तयार करायचा?

4) पांढरे शुभ्र रंगाचे तळवे असलेले लोक हे काय चांगले आणि काय वाईट यात फरक करू शकत नाहीत. असे लोक झटपट निर्णय घेतात, त्यामुळे त्यांना आयुष्यात अनेकदा त्रास सहन करावा लागतो.

Samudra Sashtra
Diwali Recipe: घरच्या घरी गव्हाचा पौष्टीक आणि खुसखुशीत चिवडा कसा तयार करायचा?

5) पायाचे तळवे काळे असलेल्या लोकांना आयुष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.