Saree Cancer: भारतीयांमध्ये वाढत चाललाय 'साडी कॅन्सर'चा धोका; नेमका काय आहे हा प्रकार? जाणून घ्या

Saree cancer: साडी कॅन्सर या आजाराचे रूग्ण भारतामध्ये जास्त आढळतात. कारण भारतातील महिला साडी नेसतात.
Saree Cancer
Saree Cancer
Updated on

Risk of saree cancer is increasing among Indian women What exactly is this type

भारतातील अनेक महिला साडी नेसतात. सध्या साडी परदेशातही खूप पसंत केली जात आहे. पण तुम्हाला माहिती आहे का साडी नेसल्याने तुम्हाला कॅन्सर आजार होऊ शकतो? फक्त साडीच नाहीतर इतर कपडेही चुकीच्या पद्धतीने घातल्यास कॅन्सर होऊ शकतो. याला वैद्यकिय भाषेत स्कॅमस सेल कार्सिनोमा ( Squamous Cell Carcinoma) म्हणतात. या आजाराचे रूग्ण भारतात सर्वाधिक आहेत. कारण भारतात महिला सर्वात जास्त साडी नेसतात.

  • भारतात साडी कॅन्सर का वाढतो आहे?

भारतातील अनेक भागांमध्ये महिला रोजच साडी नेसतात. साडी घालण्यासाठी महिला सुती पेटीकोट कंबरेवर सुती धाग्याने बांधतात. दिल्लीच्या पीएसआरआय हॉस्पिटलचे कॅन्सर सर्जन डॉ. विवेक गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर एखाद्या महिलेने एकच कापड खुप वेळ घातला तर तो कंबरेला घर्षण करतो, ज्यामुळे तिथली त्वचा सोलून काळी पडू लागते.

यामुळे साडी कॅन्सरचा धोका वाढू शकतो. तसेच कपड्यांची स्वच्छता ठेवणे देखील गरजेचे असते. शरीराच्या ज्या भागामध्ये जासेत उष्णता आणि घाम येतो तेथे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. बिहार आणि झारखंडमधून या आजाराचे प्रकरण समोर येत आहेत.

Saree Cancer
World Autism Awareness Day 2024 : मुलांच्या हाती ‘गॅझेट’ देण्याऐवजी त्यांच्याशी खेळा
  • अभ्यासात माहिती आली समोर

अभ्यासानुसार भारतीय महिलांमध्ये आढळलेल्या एकूण कॅन्सरच्या प्रकरणांपैकी 1 टक्के प्रकरणे साडी कॅन्सरची आहेत. मुंबईतील आर एन कूपर हॉस्पिटलमध्येही याबाबत संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनात साडीसोबतच धोतराचाही समावेश करण्यात आला. या साडीच्या कॅन्सरचे नाव बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिले होते. जेव्हा तिथे या प्रकरणाबाबत 68 वर्षीय महिला या आजाराने ग्रस्त होती. ही महिला वयाच्या 13 व्या वर्षापासून साडी नेसत होती.

  • टेस्टिक्युलर कॅन्सर

पुरुषांमध्ये टाइट कपडे घातल्याने हा कॅन्सर होऊ शकतो. तासंतास टाइट कपडे घालणे शरीरासाठी घातक ठरू शकते. यामुळे पुरुषांमध्ये पाठीच्या खालच्या भागात तापमान वाढते, ज्यामुळे शुक्राणूंची संख्या देखील कमी होते आणि टेस्टिक्युलर कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाचा कॅन्सर देखील होऊ शकतो. पण या संशोधनाचे ठोस निष्कर्ष येणे बाकी आहे.

  • असे कपडे घालणे टाळावे

कोणतेही कपडे घातल्यावर त्वचेवर डाग पडत असतील तर ते घालू नका.

टाइट कपडे घातल्याने त्वचा लाल होत असेल तर ते घालू नका.

श्वास घेण्यास त्रास होत असेल तर असे कपडे घालणे टाळावे.

  • कोणती काळजी घ्यावी

जर तुम्ही टाइट कपडे घालत असाल तर काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही ब्रा, अंडरवेअर सारखे आतील कपडे खूप टाइट घालत असाल तर याकडे लक्ष द्यावे. याशिवाय जिमसाठी घालण्यात येणारे टाइट कपडे देखील समस्या निर्माण करू शकतात. नेहमी स्वच्छ धुतलेले कपडे घालावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.