कोणत्याही सणात किंवा कोणत्याही फंक्शनमध्ये बनारसी साड्यांची क्रेझ नेहमीच असते. महिला प्रत्येक मोठ्या प्रसंगी बनारसी सिल्कच्या साड्या नेसतात. बनारसी सिल्क दिसायला सुंदर आणि क्लासी लुक देतात. बनारसी सिल्कच्या साड्यांना बाजारात नेहमीच मागणी असते.
अशी क्वचितच एखादी महिला असेल जिच्या वॉर्डरोबमध्ये बनारसी सिल्कची साडी नसेल. बनारसी सिल्क साडीची खूप काळजी घ्यावी लागते. त्यांची देखभाल योग्य घेतली गेली नाही तर त्या खराब होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वर्षानुवर्षे बनारसी साडी कशी सांभाळायची ते सांगत आहोत.
- काहीवेळा साडी नेसून झाल्यावर ती काळजीपूर्वक ठेवली नाही तर, पुढल्या वेळी नेसण्यासारखी ती राहू शकत नाही. साड्या कपाटात ठेवताना त्या नेहमी हॅंगरला लाऊन ठेवाव्यात. मेटलपेक्षा प्लास्टीक हॅंगरचा वापर करावा.
- बनारसी किंवा सिल्क साड्या फक्त ड्रायक्लीन केल्या पाहिजेत. तुम्हाला साड्या घरीच धुवायच्या असतील तर तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल.
- बनारसी सिल्कच्या साड्या इतर साड्यांसारख्या नसतात. तुम्हाला कोमट शाम्पूच्या पाण्यात साडी बुडवून हलक्या हातांनी धुवावी लागेल. साडी गरम पाण्यात धुवू नका.
- बनारसी सिल्कच्या साडीवर डाग पडले तर ते दूर करणे सोपे नसते. यासाठी साडी ड्रायक्लीन करावी लागते. जर तुम्हाला घरातच डाग साफ करायचा असेल तर त्यासाठी थोडे पेट्रोल घ्या आणि डाग असलेल्या जागेवर लावा. यामुळे डाग निघून जाईल.
- बनारसी साडी धुताना ब्रश कधीही वापरू नका. त्यामुळे साडी फाटण्याची भीती आहे. यासाठी हलक्या हातांनी साडी घासावी. यामुळे तुमच्या साडीची चमकही कायम राहील.
- घरच्या घरी बनारसी सिल्क साडी इस्त्री करायची असेल तर खाली साडीच्या खाली सुती कापड अंथरावे. आणि मगच साडी इस्त्री करा. यामुळे साडी कधीही जळणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.