Saree Fashion Tips : एकच साडी नेसायचा कंटाळा येतो, त्याच साडीला द्या नवा लुक, अशी नेसून पहा सगळेच कौतुक करतील

नव्या लुकसाठी साडी कापायची अन् शिवायची कटकट नाही
Saree Fashion Tips
Saree Fashion Tipsesakal
Updated on

Saree Fashion Tips : महिलांमध्ये नव नव्या साड्यांची फॅशन जास्त आहे. त्यातही सध्या वेलवेट अन् डिझायनर साडीची क्रेझ त्यांच्यात पहायला मिळत आहे. अशातच काही स्त्रिया एखादीच पण महागडी साडी घेतात. पण सतत तिच साडी नेसून सगळे कार्यक्रम अटेंड करतात.

जेव्हा एखाद्या इव्हेंटमध्ये तिच्याकडे फक्त हि एकच साडी आहे, असं तिला ऐकवलं जातं तेव्हा मग ती साडी फेकून देते. किंवा नेसायची बंद करते. असं प्रत्येकीच्या बाबतीत घडतं. आता प्रत्येकवेळी नवीकोरी तेही महागडी साडी घ्यायला आपण काही अंबानी कुटुंबातील नाही. आणि थोडेच दिवस नेसलेली साडी फेकून द्यायला इतकेही श्रीमंत नाही.

मग, अशावेळी करायचं काय, या सगळ्यावर एक उपाय आहे. तुम्ही तीच साडी नेसून जाल आणि कोणाला कळणार देखील नाही. त्यामुळेच जुन्या साडीला पुन्हा एकदा नव्याकोऱ्या लुकमध्ये कसे प्रेझेंट कराल या घ्या आयडीया.

Saree Fashion Tips
Sonalee's Saree : सोनालीच्या साड्यांनी बायकांना लावलं वेड, बघा फोटो

साडी बेल्ट स्टाइल

सध्या कोणत्याही डिझायनर साडीवर बेल्ट घालण्याचा ट्रेंड आला आहे. ज्यामुळे साडीला नवा लुक आला आहे. बेल्ट स्टाइल नेहमीप्रमाणे तुमची साडी घाला आणि फक्त बेल्ट घाला. पारंपारिक लूक मिळवायचा असेल तर कमरबंदही वापरू शकता. ऑफ-शोल्डरसारखा स्टेटमेंट ब्लाउज तुमचा लुक आकर्षक बनवू शकतो.

Saree Fashion Tips
Saree Draping Ideas : चापून चोपून साडी नेसण्याच्या या ५ टिप्स
साडी बेल्ट स्टाइल
साडी बेल्ट स्टाइलesakal

धोती स्टाईल

जुनी साडी स्टाईल करण्यासाठी तुम्ही धोती स्टाईलमध्ये ड्रेप करू शकता. या प्रकारची साडी नेसण्यासाठी पेटीकोट ऐवजी लेगिंग्ज घालता येते. तुम्ही जीन्सही या पँटमध्ये घालता येते. कॉलेज तरूणींच्या ट्रॅडिशनल डेमध्ये हा ट्रेंड आहे.  

Saree Fashion Tips
Saree Designs : बार्बीची क्रेझ वाढली! तुम्हालाही साडीत बार्बी लुक हवाय? मग या स्टायलिंग टिप्स करा फॉलो
धोती स्टाईल
धोती स्टाईलesakal

लेहेंगा स्टाईल साडी

लेहेंगा स्टाईल ड्रेप बनवणे खूप सोपे आहे कारण तुम्हाला थोडे अंतर ठेवावे लागते. तुम्ही पल्लू उघडे ठेवू शकता किंवा प्लीट्सने खांद्यावर पिन करू शकता. तुम्ही ब्लाउजसोबतही स्टाईल करू शकता.

Saree Fashion Tips
London Saree Walkathon : ‘लंडनच्या रस्त्यावर भारतीय महिलांचा साडी वॉकेथॉन’
लेहेंगा स्टाईल
लेहेंगा स्टाईल esakal

फ्रंट पल्लू स्टाइल

पल्लू तुमच्या डाव्या खांद्यावर नेण्याऐवजी तुम्ही उजव्या खांद्यावर मागून घ्या. ही गुजराती शैली आहे. या लुकमध्ये तुम्ही प्लीट्स देखील जोडू शकता. किंवा पल्लू उघडे ठेवू शकता.

नेक ड्रेप पल्लू

या प्रकारच्या स्टाइलसाठी, तुम्हाला फक्त पल्लूला दुपट्ट्याप्रमाणे तुमच्या गळ्यात वळवावे लागेल. ही शैली मिळविण्यासाठी, तुम्हाला तुमच्या पल्लूची लांबी लांब ठेवावी लागेल.

फ्रंट पल्लू स्टाइल
फ्रंट पल्लू स्टाइलesakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.