पृथा वीर
दिवाळीच्या एथनिक ट्रेंडमध्ये साडी सर्वाधिक भाव खाऊन जाते. साडी म्हणजे अभिजातपणा. आधुनिक डिझाइन, डिजिटल प्रिंटसोबत पारंपरिक शैली अशी विस्तृत रेंज तिच्यात मिळते. क्लासिक विणकामापासून ते समकालीन डिझाइनमध्ये बनारसी साडी, कांजीवरम साडी, ऑर्गेन्झा साडीसोबतच मॅचबॉक्स साडीसुद्धा ट्रेंडमध्ये आहे. अनेक साड्या महाग असल्या, तरीही दिवाळी वर्षातून एकदा येते, त्यामुळे जरा बजेटचे गणित चुकत असले तरीही दिवाळीचा साडीचा हा एथनिक ट्रेंड ट्राय करायलाच हवा.