मुलीच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

उच्चशिक्षणाची स्वप्ने पाहणाऱ्या अन्‌ ती स्वप्ने प्रत्यक्षात साकारण्यासाठी पाऊल पुढे टाकलेल्या विद्यार्थिनींना आर्थिक बळ देण्याच्या उद्देशाने राबविली जाणारी योजना म्हणजे ‘पोस्ट ग्रॅज्युएट इंदिरा गांधी शिष्यवृत्ती’.
post graduate indira gandhi scholarship
post graduate indira gandhi scholarshipsakal
Updated on

उच्चशिक्षणाची स्वप्ने पाहणाऱ्या अन्‌ ती स्वप्ने प्रत्यक्षात साकारण्यासाठी पाऊल पुढे टाकलेल्या विद्यार्थिनींना आर्थिक बळ देण्याच्या उद्देशाने राबविली जाणारी योजना म्हणजे ‘पोस्ट ग्रॅज्युएट इंदिरा गांधी शिष्यवृत्ती’. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने ही योजना राबविण्यात येते.

‘पोस्ट ग्रॅज्युएट इंदिरा गांधी शिष्यवृत्ती’ योजना केवळ एक मुलगी असणाऱ्या (सिंगल गर्ल चाइल्ड) मुलींसाठीच लागू आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या आणि अविवाहित मुलींना पदव्युत्तर शिक्षणासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. या योजनेसाठी संबंधित विद्यार्थिनी देशातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. ही विद्यार्थिनी पूर्णवेळ पदव्युत्तर अभ्यासक्रमात नियमित म्हणून प्रवेश घेतलेली असावी. वयोमर्यादा तीस वर्षांपेक्षा जास्त नसावी. दूरस्थ शिक्षण कार्यक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनीला याचा लाभ घेता येणार नाही.

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या निवडक विद्यार्थिनींना दर महिन्याला तीन हजार रुपये (म्हणजेच वर्षाला ३६ हजार रुपये) शिष्यवृत्ती मिळते. ही शिष्यवृत्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा विद्यार्थिनींच्या पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि शिष्यवृत्तीच्या संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे.

शिष्यवृत्ती योजनेतील प्रमुख मुद्दे

  • शिष्यवृत्ती केवळ अविवाहित मुलींसाठी

  • विद्यार्थी कोणत्याही सरकारी नोकरीत असल्यास लाभास पात्र नसेल

  • इतर कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थिनीस ही योजना लागू नसेल

  • शिष्यवृत्तीसाठी गुणवत्तेच्या आधारे होईल निवड

आवश्यक कागदपत्रे

  • आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, विद्यापीठाचे ओळखपत्र

  • पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रक, पदव्युत्तर प्रवेश प्रमाणपत्र

  • निवास प्रमाणपत्र, पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ - https://www.ugc.gov.in/Scholarships/stu_Scholarship4

(शब्दांकन : मीनाक्षी गुरव)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com