अभिमानास्पद! शिमला-चंदिगड मार्गावर बस चालवणारी सीमा ठाकूर पहिली महिला

अभिमानास्पद! शिमला-चंदिगड मार्गावर बस चालवणारी सीमा ठाकूर पहिली महिला
Updated on

आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. कोणतंही काम असो वा क्षेत्र महिला कोठेही कमी नाहीत. अगदी कॉर्पोरेट कंपन्यांपासून ते रिक्षा चालवण्यापर्यंत विविध क्षेत्रांमध्ये महिला अग्रेसर आहेत. यामध्येच सध्या हिमाचल प्रदेशमध्ये राहणाऱ्या सीमा ठाकूर या महिलेची चर्चा रंगली आहे. सीमा बस चालवत असून त्या एचआरटीसीच्या(Himachal Pradesh Road Transport Corporation) पहिल्या महिला बस चालक ठरल्या आहेत.

हिमाचल प्रदेशमध्ये राहणाऱ्या सीमा या शिमला-चंदीगढ आंतरराज्य मार्गावर बस चालवत असून त्या एचआरटीसीच्या पहिल्या महिला चालक ठरल्या आहेत. विशेष म्हणजे या मार्गावर बस चालवून त्यांनी एक नवा इतिहास रचला आहे.

सीमा यांनी काही दिवसांपूर्वीच चंदीगढ मार्गावर ३७ सीट्सची बस चालवली. त्यामुळे आंतरराज्य मार्गावर बस चालवणाऱ्या त्या हिमाचलमधील पहिल्या महिला चालक ठरल्या आहेत. आतापर्यंत त्या शिमला -सोलन या मार्गावर इलेक्ट्रिक बस चालवत होत्या. त्यानंतर त्यांना आंतरराज्य मार्गावर बस चालवण्याची संधी देण्यात आली. सकाळी ७.५५ वाजता त्या शिमलावरुन चंदीगढच्या दिशेने रवाना झाल्या होत्या. दुपारी १२.१५ वाजता त्या चंदीगढमध्ये पोहोचल्या आणि त्यानंतर पुन्हा १२.३० वाजता त्या शिमलासाठी मार्गस्थ झाल्या.

सीमा या उच्च शिक्षित असून त्यांनी शिमलामधील कोटशेरा महाविद्यालयातून बीएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तर, एचपीयू शिमला येथून एमए इंग्लिश केलं आहे. सीमा यांचे वडील बलिरामदेखील एचआरटीसीमध्ये बस चालक होते. त्यामुळे आपल्या वडिलांनाच त्या गुरु मानतात,असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.