Self-Discipline : या 6 गोष्टींची शिस्त स्वतःला लावून घ्या, Success तुमची पाठ कधीच सोडणार नाही

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी स्वयंशिस्त आवश्यक असते.
Self-Discipline
Self-Disciplineesakal
Updated on

6 Powerful Ways To Master Self-Discipline : जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर स्वयं-शिस्त ही हवीच. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अनेक आव्हाने समोर येत असतात, त्यातून यशस्वीरित्या पार पडण्यासाठी स्वयंशिस्त फार उपयुक्त ठरते. स्वयंशिस्त ही एखाद्याला आपल्या ध्येयाच्या मार्गावर टिकवून ठेवण्यासाठी आणि ध्येय गाठण्यासाठी नियंत्रित आणि प्रेरीत करत असते. ही स्वयंशिस्त तुम्ही पुढील 6 मार्गांनी मिळवू शकतात.

Self-Discipline
Self-Disciplineesakal

लाईइफ ऑडिट

स्वतःचं निरीक्षण करा. तुम्ही तुमची जी ओळख निर्माण करत आहात त्याकडे नीट लक्ष द्या. तुमच्या ध्येयाविषयी फक्त विचार नाही तर कृती हवी. तुम्हाला जशी व्यक्ती बनायचे आहे त्याविषयी विचार करा. जसे तुम्हाला बनायचे आहे तसा विचार केल्याने तुम्हाला त्यादृष्टीने कृती करण्यास मदत मिळते.

रिमाइंडर्स लावा

आपल्याला काय करायचे आहे हे विसरले जाऊ शकते. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर करा. कॅलेंडर, टू डू लिस्टमध्ये रिमांडर्स सेट करून ठेवा.

Self-Discipline
Success Tips : यशस्वी व्हायचं असेल तर सोडा या ६ सवयी, गुरू गौर गोपाल दास यांनी दिल्या खास टिप्स
Self-Discipline
Self-Disciplineesakal

आव्हाने स्वीकारा

सर्वात कठीण लढाई बऱ्याचदा आपल्या आतली असते. संघर्षाशिवाय काहीही अर्थपूर्ण साध्य होत नाही. गोष्टी किती कठीण आहेत याचा विचार करण्याऐवजी तुम्ही कालांतराने करत असलेल्या वाढीव प्रगतीचा विचार करा.

स्वतःची काळजी घ्या

जेव्हा तुम्हाला शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या चांगले वाटत नाही तेव्हा योग्य निर्णय घेतले जात नाहीत. त्यालाठी शारीरिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या स्वतःची काळजी घ्या. वाचन करून मानसिक आरोग्य, व्यायामाने शारीरिक आरोग्य आणि कृतज्ञतेचा सराव करून आध्यात्मिक आरोग्य वाढवा

Self-Discipline
Success Tips : प्रयत्न करूनही अपयशच पदरी पडतंय? या उपयांनी उघडेल यशाचे दार
Self-Discipline
Self-Disciplineesakal

ध्यानाचा सराव

रोज किमान 10 मिनीटे ध्यानाचा सराव करा. विचार येतात त्यांना येऊन जाऊ द्या. त्यावर पुन्हा विचार करू नका. फक्त तुम्हाला कसं वाटतंय याचा विचार करा.

चांगल्या नव्या सवयी लावून घेणे

लहान सुरुवात करणे, जबाबदारी घेणे, तुमच्या प्रगतीचा मागोवा घेणे आणि तुमचे विजय साजरे करणे या सर्व सवयी निर्माण करणे गरजेचे आहे. हेच तुमच्या यशाला मदतशीर ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.