Self Talk : स्वतःशी बोलणं वेडेपणाचं नाही तर आरोग्यासाठी फायद्याचं, संशोधनातून सिध्द

संशोधक आणि समुपदेशकांचं म्हणंन आहे की, असं स्वतःशीच बोलणं हे तुमचा ताण कमी करतं आणि त्यामुळे निमंत्रित होणाऱ्या आजारांपासून दूर ठेवतं.
Self Talk
Self Talkesakal
Updated on

Self Talk Good For Health : बऱ्याचदा कोणी स्वतःशी बडबडताना दिसलं की आपण त्याला म्हणतो वेडा आहेस का? असं एकट्याने बडबडायचं नाही असं सुचवून मोकळं होतो. पण आपल्या या सार्वजनिक वक्तव्याला छेद देणारं संशोधन झालं आहे. स्वतःशी बोलणं हे आरोग्यदायी असतं असं संशोधकांचं म्हणंन आहे.

आपल्या विचारांना शब्द देणाऱ्या या बोलण्याला 'सेल्फ टॉक' म्हणतात. संशोधक आणि समुपदेशकांचं म्हणंन आहे की, असं स्वतःशीच बोलणं हे तुमचा ताण कमी करतं आणि त्यामुळे निमंत्रित होणाऱ्या आजारांपासून दूर ठेवतं. नवीन दिवसाला सामोरे जाण्यासाठी दररोज सकाळी उठण्यापूर्वी, आरशासमोर ५ मिनिटे उभे राहूण आणि आपण लहान मुलाशी जसे प्रेमाने बोलतो तसे बोलणे महत्वाचे आहे. तुमचे स्वतःचे नाव घ्या आणि सकाळी मोठ्याने म्हणा, 'ऐका, तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही साध्य करू शकता, मला तुझा अभिमान आहे'.

Self Talk
Self Talkesakal

जाणून घेऊया फायदे

आंतरिक भीती कमी होते

आंतरिक भीती कमी होते आणि आगामी कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण अधिक लक्ष केंद्रित करू शकतो.

आत्मविश्वास वाढतो

यासंदर्भातील एक संशोधनही तेच सांगते. सेल्फ-अफर्मेशन थिअरी - स्टील, 1988 च्या अनुभवजन्य अभ्यासानुसार, आपण जेव्हा घरातून बाहेर पडण्यापूर्वी 5 मिनिटे योग्य, सकारात्मक स्वरात स्वतःशी बोलतो, तेव्हा दिवस चांगला जाण्याची शक्यता अनेक पटींनी वाढत असते.

एमआरआय स्कॅनही हे सूचित करतात की, जेव्हा लोक दररोज स्वयं-पुष्टीकरणाचा सराव करतात तेव्हा आपल्या मेंदूतील न्यूरल मार्गांची संख्या वाढते (कॅसिओ एट अल., 2016) आणि फक्त व्हेंट्रोमेडियल प्रीफ्रंटल कॉर्टेक्समध्ये.) स्वतःचे सकारात्मक मूल्यांकन करण्यासाठी आणि माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी जबाबदार प्रणाली स्वतः अतिक्रियाशील बनते.

self Tlak
self Tlakesakal

विचारांना शब्द सापडतात

तुम्हाला आठवतंय का, शाळेच्या दिवसात शिक्षक आणि पालक आपल्याला अनेकदा सांगायचे की, तुम्ही जे काही शिकता ते लिहा म्हणजे तुमच्या चांगले लक्षात राहिल. त्यामागचे कारण म्हणजे ते विचार आपल्या मनात कुठेतरी हरवून जातात. लिहिता-बोलताना स्पष्टता प्राप्त होते. आपण स्वतःशी बोलतो तेव्हा आपल्याला समजते की, आपल्याला आपल्याकडून काय हवे आहे आणि आपण ते कसे साध्य करू शकतो.

तणावाची पातळी कमी होते

एखाद्या दिवशी एखादी स्पेशल मीटिंग किंवा प्रेझेंटेशन द्यायचे असेल, तेव्हा सकाळी उठून त्याचा विचार केला तर चिंता सुरू होते. ही चिंता आपल्या मनात ठेऊन ती आपल्याला घाबरवते. यामुळे तुमचा परफॉर्मंस नीट होऊ शकत नाही. आपण स्वतःशी प्रेमाने बोलतो तेव्हा मनातील भीती आणि अस्वस्थता कमी होते आणि मन शांत होते.

उत्पादकता वाढते

तणाव कमी होऊन मन शांत राहिल्याने तुमचे मन कामात अधिक गुंतून राहते आणि काम अधिक चांगले होते. जेव्हा तुम्ही दिवसभर काम करत असता आणि तुमचे मन घाबरू लागते, तेव्हा स्वतःला सांगा, 'ऑल इज वेल'. आणि सकारात्मक वृत्तीने तुमचे काम सुरु ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()