Senapati Kolhapuri Chappal: कोल्हापुरीमध्ये पण भारी अशी ओळख असलेली सेनापती कापशी चप्पल नेमकी कशी ? जाणून घ्या इतिहास

सेनापती कापशी गावाला आहे ऐतिहासिक वारसा
Senapati Kolhapuri Chappal
Senapati Kolhapuri Chappalesakal
Updated on

Senapati Kolhapuri Chappal: आजकाल एखादे लग्न यात्रा, उत्सव किंवा कॉलेजचा ट्रॅडिशनल डे असो प्रत्येकजण रूबाब मारताना दिसतो तो म्हणजे कोल्हापुरी चपलाचा. शेरवानी, कुर्ता, डोळ्यावर गॉगल, डोक्यावर फेटा अन् पायाच कोल्हापुरी पायतान. त्यात बी ती कररर-कररर असा अवाज करणारी असली तर विषय खोल होतोय.

कोल्हापुरी पायतानाचा हा ट्रेंड तरूणाईचमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. कोल्हापुरी म्हटलं की पायतान एवढंच समीकरण आपल्याला दिसतं. पायतानाचेच नाव आपल्या नजरेत येत. पण पायतान म्हणजेच कोल्हापुरी चप्पलेची शैली असच म्हटलं जातं. पण, कोल्हापुरी म्हणजे तेवढंच नाही. कोल्हापुरात अनेक प्रकारची चप्पल बनतात. त्यापैकी तुम्ही कधीतरी ऐकलेलं नाव म्हणजे सेनापती कापशीच चप्पल होय.

कोल्हापूरी चप्पलाचा इतिहास पाहिला तर १३ शतकात उदयास आले. ते खुपच जाड चामड्याचे होते. त्यानंतर १९२० मध्ये कोल्हापुरातील कारागिरांनी नवीन पद्धतीच्या चपला तयार करून तिचा आकार पहिल्यापेक्षा पातळ केला. त्याची ओळख कोल्हापुरी चपला अशी झाली. याच दरम्यान कोल्हापुरातल्या कागल तालुक्यातील कापशी गावात नवे चप्पल उदयास आले ते म्हणजे कापशी चप्पल होय.

Senapati Kolhapuri Chappal
Kolhapuri Chappal: विषयच हार्ड! कोल्हापुरी चप्पल बनविणाऱ्या 32 कारागिरांना GI प्रमाणपत्र; राष्ट्रीय स्तरावर मान्यता

कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्याजवळ सेनापती कापशी हे गाव आहे. ‘कापशी’ गावात, अस्सल चामड्यात बनवली जाणारी ही चप्पल, बऱ्याचदा त्या गावावरून कापशी म्हणूनही ओळखली जाते. साधारणपणे कोल्हापुरी चप्पल म्हणलं की हीच डोळ्यासमोर येत असते.

कोल्हापूर संस्थानमधील एकूण नऊ जहागिररींपैकी कापशी हे एक गाव. या गावची भौगोलिक रचना पाहता सभोवती डोंगर आहेत व गावाजवळ आल्याशिवाय गाव दिसत नाही. कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर हे गाव वसले आहे.

कर्नाटकात मोहिमेवर जाताना अत्यंत सुरक्षित म्हणून त्यावेळच्या राजांनी या गावाची निवड केली. हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांचे हे संस्थान गाव. यावरून या गावाला 'सेनापती कापशी' हे नाव पडले.

कापशी चप्पलला मोठा इतिहास असून, या चप्पलमुळे कागल तालुक्याचेच नव्हे, तर कोल्हापूर जिल्ह्याचे नाव संपूर्ण भारतात व परदेशातही प्रसिद्ध झाले आहे.

Senapati Kolhapuri Chappal
April Fools' Day : कोल्हापुरी चप्पलच्या बाबतील तुम्हाला कोणी एप्रिल फुल तर करत नाही ना? असे ओळखा अस्सल कोल्हापुरी!

या चपलेबद्दल बोलताना चव्हाण कुटुंबियांना विसरून कसे चालेल. दोनशे वर्षांपूर्वी येथील गोविंदा लक्ष्मण चव्हाण यांनी येथील राजे घराण्यातील घोरपडे सरकारांना चमड्यापासून एक आकर्षक चप्पलचा जोड करून दिला.

तत्कालीन घोरपडे सरकारांनी हा जोड देवास (उत्तर प्रदेश) सह इतर संस्थानांतील सरकारांना दाखविला. त्यांनाही हा जोड आवडला व त्यांनीही या चप्पलची मागणी केली आणि पाहता पाहता कापशी चप्पलने देश-परदेशांतही आपली हुकमी बाजारपेठ तयार केली.

एक कापशी चप्पलचा जोड तयार होण्यास पाच ते सहा दिवस लागतात. चप्पलवरचे आकर्षक रेखीव काम महिला करतात. हे रेखीव कामही चमड्यापासून केले जाते. एका चप्पलच्या जोडची किंमत चार हजार रुपये असून, मागणीप्रमाणेच चप्पल तयार केले जाते. चमडे कठीण करण्यासाठी खूप श्रम घ्यावे लागते. (Kolhapur)

Senapati Kolhapuri Chappal
Kolhapuri Chappal: कोल्हापुरी चप्पलची गुणवत्ता टिकवणे गरजेचे ; ओंकार धर्माधिकारी

स्वर्गीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे माप

गावात त्या काळात दत्तात्रय कृष्णाजी चव्हाण यांनी हे काम सुरू केलं. तेव्हापासून आतापर्यंत त्यांची पिढी हे काम करत आहे. दत्तात्रय चव्हाण यांनी स्वर्गीय मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना कित्येक वर्षे कापशी चप्पलचा जोड तयार करून दिला आहे. आजही त्यांच्या पायाचे माप चव्हाण यांच्या दुकानात उपलब्ध आहे.

सेनापती कापशी चप्पलेचे तीन प्रकार आहेत

साधारण कापशी: साधारण कापशी म्हणजेच हाताने शिवलेली चप्पल होय. या चपलेत दोन पट्टे असतात. पट्टे म्हणजेच चामड्याच्या वेणी होय. चामड्याच्या बारीक वेण्या बांधणं वाटतं तितकं सोप्प काम नाहीय. काही ठिकाणी ८ वेण्यांचा तर काही ठिकाणी १२ वेण्यांचा पट्टा असतो. प्रत्येक कलाकाराची स्वतःची एक नजाकत असते आणि त्याची वर्षानुवर्षे त्याची स्वतःची एक शैली घडत जाते. (Chappal)

Senapati Kolhapuri Chappal
VIDEO : कोल्हापुरी चप्पल अन् फेटा! सचिन तेंडुलकरचा मराठमोळा लूक व्हायरल

पेपर कापशी: साधारण कापशी नंतर येते ती पेपर कापशी, नावामुळेच कळल असेलच कि हि पातळ असते अगदी कमी जाडीची सडसडीत अशी, हि इतकी पातळ असते. कीअक्षरशः गुंडाळून बॅगमध्ये ठेवता येते. हि अनेक कारणांसाठी वापरली जाते, artistic लोक किंवा हलकी फुलकी वहाण वापरायची आवड ठेवणारे खास आवडीने पेपर कापशी वापरतात.

जाड कापशी - जाड कापशी हि खास रांगड्या लोकांसाठी असते. ज्यांना भक्कम पायतान वापरायची बक्कळ हौस आणि आवड असते. तीन तळीची असणारी हि वहाण चांगलीच जाडजुड असते तितकीच मजबूत सुद्धा. अशा या कापशी चपलेचा रूबाब काही औरच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.