September holidays : सप्टेंबर महिन्यात एवढ्या आहेत सार्वजनिक सुट्ट्या

दरम्यान महाराष्ट्रात ६ दिवस बँका बंद राहतील आणि २४ दिवस कामकाज सुरु असेल. यामध्ये फक्त दुसरा आणि चौथा शनिवार-रविवारचा समावेश आहे.
September holidays
September holidaysgoogle
Updated on

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) सप्टेंबर २०२२ च्या कॅलेंडरमध्ये दुसरा शनिवार आणि रविवार वगळून ६ दिवस बँक बंद राहणार आहेत. सप्टेंबर महिन्यात विविध राज्यांमध्ये बँकांना ११ सुट्ट्या मिळण्याची शक्यता आहे; ओणम सणानिमित्त केरळमध्ये या महिन्यात सर्वाधिक सुट्ट्या आहेत.

सप्टेंबरमध्ये श्री नारायण गुरु जयंती, कर्म पूजा, पहिला ओणम, तिरुवोणम, इंद्रजात्रा, श्री नरवण गुरु जावंती, श्री नारायण गुरु समाधी दिन, नवरात्री स्थापना/ मेरा चौरेन हौबा लानिंगथौ सनमाहीच्या निमित्ताने सार्वजनिक सुट्ट्या आहेत. दरम्यान महाराष्ट्रात ६ दिवस बँका बंद राहतील आणि २४ दिवस कामकाज सुरु असेल. यामध्ये फक्त दुसरा आणि चौथा शनिवार-रविवारचा समावेश आहे.

सप्टेंबर २०२२ मधील राज्यनिहाय सार्वजनिक सुट्ट्यांची यादी


१ सप्टेंबर (गुरुवार)- गणेश चतुर्थीनिमित्त गोव्यात बँका बंद
६ सप्टेंबर (मंगळवार)- झारखंडमध्ये कर्मपूजेच्या निमित्ताने बँका बंद राहणार.
७ सप्टेंबर (बुधवार)- केरळमध्ये पहिल्या ओणमच्या निमित्ताने बँका बंद असतील.
८ सप्टेंबर (गुरुवार)- केरळमध्ये तिरुवोनमच्या निमित्ताने बँका बंद.
९ सप्टेंबर- (शुक्रवार)- महाराष्ट्रात अनंत चतुर्दशीनिमित्त आणि सिक्कीममध्ये इंद्रजात्रेनिमित्त बँका बंद राहतील.
१० सप्टेंबर- (शनिवार)- केरळमध्ये श्री नरवण गुरु जावंतीनिमित्त बँका बंद राहणार आहेत.
२१ सप्टेंबर- केरळमध्ये श्री नारायण गुरु समाधी दिनानिमित्त बँका बंद राहतील.
२६ सप्टेंबर- मणिपूर आणि राजस्थानमध्ये लैनिंगथौ सनमाहीच्या नवरात्री स्थापना/ मेरा चौरेन हौबा निमित्त बँका बंद राहतील.

सप्टेंबरमध्ये वीकेंडची सुटी
४ सप्टेंबर: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
१० सप्टेंबर: दुसरा शनिवार
११ सप्टेंबर : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
१८ सप्टेंबर : रविवार (साप्ताहिक सुट्टी)
२४ सप्टेंबर : चौथा शनिवार
२५ सप्टेंबर : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार रविवारी तसेच महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. याशिवाय महिन्यात चार रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार असतो. दरम्यान ऑगस्ट २०२२ मध्ये भारतीय वित्तीय संस्था एकूण १९ दिवसांसाठी बंद होत्या. या १९ दिवसांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार, रविवारचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.