मुंबई : आजकाल करिअरसाठी प्रत्येकजण आपल्या शहराच्या, देशाच्या सीमा ओलांडून बाहेर जाऊ लागला आहे. अविवाहीत असताना या गोष्टीने फारसा फरक पडत नाही; पण लग्न झाल्यानंतर पती-पत्नीमधील भौगोलिक अंतर वैवाहिक आयुष्यात अडचणीचे ठरते.
एकमेकांना व्हिडिओ कॉल करून तुम्ही विचारपूस करू शकता; पण त्यातून शारीरिक विशेषत: लैंगिक गरज भागत नाही. अशा वेळी काही क्लृप्त्या तुमची लैंगिक गरज भागवू शकतात. (Sex in Long Distance Relationship)
१. एकमेकांपासून दूर असतानाही लैंगिक सुख मिळवण्याची एक सोपी पद्धत आहे. अशा वेळी तुमची कल्पनशक्ती, स्मरणशक्ती कामी येते. तुम्ही एकत्र असतानाही किमान एकदा तरी तुमच्यात लैंगिक संबंध झाले असतील तर त्या आठवणींमध्ये रमणे तुमच्यासाठी आनंददायी असू शकते. न झालेल्या गोष्टींचीही कल्पना तुम्ही करू शकता.
२. आजकाल तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. त्यामुळे आपली मादक छायाचित्रे आणि तशाप्रकारचे संदेश यांची देवाण-घेवाण तुम्ही फोनच्या माध्यमातून करू शकता; मात्र हे सगळं करत असताना तुमचा एकमेकांवर विश्वास असणे आवश्यक आहे. आपल्या जोडीदाराच्या प्रतिष्ठेचा आदर करून तुमच्यातील संभाषणाचे खासगीपण जपणे गरजेचे आहे.
३. हस्तमैथुन हा शरीरसुखाचा आणखी एक मार्ग आहे. यामुळे जोडीदाराच्या अनुपस्थितीत मानसिक समाधान मिळवता येते.
४. हस्तमैथुन करतानाचे छोटे-छोटे व्हिडिओज तुम्ही जोडीदाराला पाठवू शकता. यातून त्या व्यक्तीला नैत्रसुख तर मिळेलच पण, त्यातील आवाजांमुळे जोडीदार लैंगिक दृश्यांची कल्पना करण्यासाठी प्रवृत्त होईल.
५. शरीरसुख मिळवण्यासाठी स्काइप आणि व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल्सचाही वापर तुम्ही करू शकता. एखाद्या खोलीत काळोख करून व्हिडिओ सुरू करा. मेणबत्तीच्या प्रकाशातील मादक वर्तणूक किंवा हस्तमैथुन यांमुळेही जोडीदारही तसे करण्यास प्रवृत्त होईल.
६. या सगळ्यामध्ये एक गोष्ट सर्वात जास्त महत्त्वाची असते ती म्हणजे 'संवाद'. या सर्व कृती करण्यापूर्वी, करताना आणि त्यानंतरही तुमच्यात पुरेसा संवाद होणे आवश्यक आहे. तुमच्या लैंगिक कल्पना, शारीरिक समस्या यांविषयी जोडीदाराशी मोकळेपणाने बोला.
एकमेकांपासून दूर असतानाही शरीरसुख मिळवणे फार कठीण नसते. फक्त त्यासाठी नव्या पद्धतीने चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करता आला पाहिजे. गरज असेल तेथे तज्ज्ञांचा सल्लाही घ्यावा.
फक्त सोशल मीडियावर, गुगलवर मिळणाऱ्या माहितीवर अवलंबून न राहाता त्या माहितीची विश्वासार्हता आणि त्याची आपल्यासाठी असलेली उपयुक्तता यांचा सारासार विचार करूनच पुढील पाऊल उचलावे.
यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य आनंददायी होईलच शिवाय जेव्हा तुम्ही खूप मोठ्या कालावधीनंतर भेटाल तेव्हा तुमची एकमेकांशी पुरेशी ओळख झालेली असेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.