Google Search On Sex: सेक्सविषयी इंटरनेवर सर्वाधिक विचारले जातात हे 4 प्रश्न; तुम्हीही सर्च करता का?

लैंगिक आरोग्याबाबत तुम्हालाही असे प्रश्न पडतात का?
Google Search On Sex
Google Search On Sexesakal
Updated on

Sexual Health: सेक्सविषयी आजही समाजात उघडपणे बोलले जात नाही. मात्र सेक्सच्या अपूर्ण माहितीमुळे तरूण पिढीकडून नकळत बऱ्याच चुका घडण्याची शक्यता असते. उघडपणे बोलता येत नसले तरी इंटरनेटच्या माध्यमातून बरेच लोक यासंदर्भात सर्च करत असतात. शारीरिक संबंधांब युजर्स नेमकं इंटरनेटवर काय सर्च करतात ते जाणून घेऊया. कदाचित तुम्हालाही कधीतरी हेच प्रश्न पडले असतील.

युजर्स इंटरनेटवर खालील प्रश्न विचारत त्यांना पडलेल्या स्वप्नांच्या शोधात असतात.

शारीरिक संबंधाविषयी स्वप्न पडणं सामान्य आहे काय?

लोक बऱ्याचदा इंटरनेटवर त्यांच्या दैनंदिन जीवनात घडलेल्या गोष्टींबाबत सर्च करत असतात. इंटरनेटच्या मते, तुम्हाला शारीरिक संबंधाची तीव्र इच्छा असेल तर ते मिळवण्याची इच्छा आणखीन वाढेल. मानसशानुसार आपली स्वप्ने केवळ आपल्या इच्छांवर आधारित असतात. म्हणूनच सेक्सबद्दल विचार करणे किंवा स्वप्न पाहणं ही एक अतिशय सामान्यगोष्ट आहे.

सेक्शुअल ट्रांसमिटेड डिसीज (STD) झाल्यावर काय करायचं?

इंटरनेट सांगतं, एसटीडी तुमच्या लैंगिक आरोग्यासाठी धोकादायक आहे. तुमच्या लैंगिक अवयवांजवळ जळजळ, खाज, इरिटेशन किंवा इन्फेक्शन जाणवल्यास तातडीने स्त्रीरोगतज्ज्ञांद्वारे तपासणी करून घ्यावी.(Health)

सेक्स टायमिंग कसा वाढवावा?

हा इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केल्या जाणारा प्रश्न आहे. नेटकऱ्यांकडून विचारल्या गेलेल्या या प्रश्नांवर इंटरनेट सांगतं की, ज्या व्यक्तींना फास्ट एजाक्यूलेशनची समस्या असते त्यांनी एक सोपी प्रॅक्टिस केली पाहिजे. दरम्यान सेक्सचा टायमिंग वाढवण्यासाठी डॉक्टरांची मदत घेणंही फायदेशीर ठरतं.

प्रेग्नेंसी रोखण्यासाठी प्रोटेक्शनवर विश्वास ठेवावा का?

याचं उत्तर इंटरनेटवर सर्च केल्यास तुम्हाला उत्तर मिळेल की, होय हे फार गरजेचे आहे. असे अनेक कॉन्ट्रासेप्टिव प्रोडक्ट्स आहेत जे नको असलेली प्रेग्नेंसी रोखण्यासाठी मदत करतात. लैंगिक संबंधांदरम्यान कंडोमचा वापर करणं सुरक्षित मानलं जातं. (pregnancy)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.