Sext: रिलेशनशिपमध्ये असलेल्या लव्ह कपल्स किंवा नवविवाहित जोडप्यांना सेंक्स्टिंग केल्यास त्यांचे नाते सुरळीत चालले आहे असे वाटते. मात्र संशोधकांचं म्हणणं याउलट आहे. अलबर्टा विद्यापिठातील संशोधकांच्या मते, सेक्स रिलेटेड फोटोज सेंड करण्याचे काही आश्चर्यकारक परिणाम आहेत. ते वाचून कदाचित तुम्हीही चकीत व्हाल.
संशोधकांच्या मते, सेक्स्टच्या माध्यमातून तुमच्या भावना योग्य प्रकारे पोहोचतीलच असं नाही. अनेकदा तुम्ही परिधान केलेल्या कपड्यांवरील टेक्स्ट वाचूनही जोडीदाराचा गैरसमज होऊ शकतो. जे लोक नियमितपणे त्यांच्या जोडीदाराला सेक्स करतात त्यांना सेक्स न करणाऱ्यांच्या तुलनेत जास्त लैंगिक समाधान मिळते.
संशोधनात हे देखील समोर आले आहे की नियमित सेक्स्ट केल्याने तुमच्या नातेसंबंधांमध्ये चुकूचे परिणामही दिसू शकतात. सेक्ट करणाऱ्या जोडप्यांमधील नात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संघर्ष दिसून येतो. तसेच लैंगिक संबंधात असुरक्षितताही निर्माण होते. तसेंच जोडप्यांमध्ये कमिटमेंटही टिकत नाहीत. नियमित सेक्स्ट करणारे हायपर-सेक्स्टर्स त्यांच्या संबंधांच्या इतर पैलूंबद्दल एकंदरीत फारच कमी समाधानी असतात.
सेक्स्ट आणि सेक्स्टर्स म्हणजे काय?
कायम लैंगिक गोष्टींबाबत किंवा सेक्स संबंधित मॅसेज करणारऱ्यांना सेक्स्टर असं म्हटलं जातं. सेक्स्ट म्हणजे लैंगिक संबंध दर्शवणारे मॅसेज किंवा फोटो सेंड करणे.
संशोधनात हेदेखील आढळून आले की, सेक्स्टर्स त्यांचा जास्तीत जास्त वेळ जोडीदारासोबत फक्त फोनवरच घालवतात. त्यामुळे त्यांच्या नात्यातील ओलावा कमी होत जातो. आणि त्यांच्यात शारीरिक संबंधांपेक्षा सेक्स्ट करण्याचं प्रमाण जास्त असते. तंत्रज्ञान सेक्स्टर्सच्या नात्यातील अडचण ठरू शकतं. कारण असे लोक त्यांच बाँडिंग, एकमेकांशी बोलणे हे सगळं विसरून संभोग करणाऱ्या सेक्स्टच्या माध्यमातूनच स्वत:ला समाधानी करण्याच्या विचारात असतात.
शास्त्रज्ञांच्या मते सेक्स्टर्स त्यांची नाती घट्ट करण्याऐवजी तंत्रज्ञानावरील लैंगिक कम्यनुकेशन करत नात्यांना टिकवण्यासाठी कठोर परिश्रम घेत नाहीत. तुम्हीही असे करत असाल तर तुमच्या नात्यासाठी ते घातक ठरू शकतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.