Shahrukh Khan quits smoking: एके काळी चेन स्मोकर असलेल्या शाहरूख खानने आपल्या उत्तम आरोग्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्याने अलिकडेच धूम्रपान सोडल्याचे घोषित केले. मोठा चाहता वर्ग असलेल्या किंग खानने हा अतिशय महत्त्वाचा निर्णय त्याच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त वांद्रे येथे त्याच्या फॅन क्लबने आयोजित केलेक्या कार्यक्रमात शेअर केला.
इव्हेंटमधील एका व्हिडिओ क्लिपमध्ये तो म्हणाला, "एक चांगली गोष्ट आहे - मित्रांनो, मी आता धूम्रपान करत नाही. मला वाटले की धूम्रपान सोडल्यानंतर मला इतका दम लागणार नाही, पण तरीही मला ते जाणवते. इन्शाअल्लाह, तेही ठीक होईल.” त्याची ही घोषणा चाहत्यांसाठी एक सकारात्मक संदेश आहे, ज्यांनी त्याच्या प्रतिभा आणि करिश्माची दीर्घकाळ प्रशंसा केली आहे.