Shankh Vastu Tips : देवघरात नक्की कुठे असावा शंख? काय म्हणतात ज्योतिषी

आयुर्वेदानुसार शंख वाजवण खूप चांगलं असतं, त्यामुळे घरातली सकारात्मक ऊर्जा वाढते, आणि जो माणूस शंख वाजवतो त्याची तब्बेतही चांगली राहते.
Shankh Vastu Tips
Shankh Vastu Tipsgoogle
Updated on

मुंबई : आपण अनेक देवांच्या फोटोंमध्ये त्यांच्या हातात शंख बघतो, पूजेमध्येही शंख वापरण खूप शुभ मानलं जातं. प्रत्येकाच्या देवघरात छोटासा का होईना पण शंख असतोच. पूर्वी तर कोणत्याही शुभ कार्याआधी शंखनाद केला जायचा.

आजही काही घरांमध्ये रोज शंखनाद केला जातो, कोणतंही शुभ कार्य शंखाशिवाय अपूर्ण असतं अशी त्याची ख्याती आहे. आयुर्वेदानुसार शंख वाजवण खूप चांगलं असतं, त्यामुळे घरातली सकारात्मक ऊर्जा वाढते, आणि जो माणूस शंख वाजवतो त्याची तब्बेतही चांगली राहते.

Shankh Vastu Tips
Astro Tips : मंदिराच्या आत कधीच घेऊन जाऊ नका या वस्तू; पूजा होणार नाही मान्य

शंख हा समुद्रात सापडतो. शंख विजय, समृद्धी, आनंद, शांती, प्रसिद्धी, कीर्ति आणि लक्ष्मी यांचे प्रतीक मानला जातो. शंख हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. समुद्र मंथनातून पंचजन्य नावाचा पांढरा शंख बाहेर आला होता. विष्णू पुराणानुसार, माता लक्ष्मी ही समुद्रराजाची कन्या असून शंख तिचा भाऊ आहे. म्हणूनच असंही म्हणतात की जिथे शंख आहे तिथे लक्ष्मी देवी वसते.

शंख नक्की कुठे ठेवावा असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो, काही लोकं म्हणतात, शंख घराच्या उत्तर दिशेला हवा तर काही लोकं म्हणतात की पूर्वेला असावा, पण याबाबत खूप संभ्रम आहेत. शंख ठेवण्याचे काही नियम आहेत, जे प्रखर्षाने पाळले तर खूप फायदे होतात.

Shankh Vastu Tips
Astro Tips : सतत चिडचीड होतेय? ग्रहदिशा तर फिरली नाही ना?

शंख ठेवण्याचे नियम

- देवघरात शंख ठेवायचा असेल तर गणेश गोमुखी, कावरी आणि दक्षिणावर्ती शंख असावा; त्यामुळे घरात धनधान्याची कधीही कमी भासत नाही.

- शिवरात्री आणि नवरात्रीच्या दिवशी शंख विकत घेणं खूप चांगलं असतं. शंख नेहमी नैऋत्य दिशेला ठेवावा, यामुळे घरात सुख-शांती राहते.

- शंखाची स्थापना करण्यापूर्वी गंगाजलाने आंघोळ करून नंतर पितळाच्या किंवा तांब्याच्या ताटात त्याला ठेवून त्याचा अभिषेक करावा.

- रोज देवांबरोबर शंखाचीही पूजा करावी याने लक्ष्मी देवी आणि भगवान विष्णू खुश होतात.

- जो शंख पूजेसाठी ठेवला आहे त्याला वाजवू नका नाहीतर घरात वाद होतील. त्या शंखात नेहमी पपाणी भरून ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.