Shardiya Navratri 2024 : महिलांना जटामुक्त करणं, निराधारांना साथ देऊन समाजकार्याचा वसा घेतलेली नवदुर्गा गीता हासूरकर

अनेक अडचणीवर मात करत त्यांनी साठहून अधिक महिलांना जटांमधून मुक्त केलं आहे
Shardiya Navratri 2024
Shardiya Navratri 2024esakal
Updated on

Shardiya Navratri :

आपल्याला दररोज अनेक व्यक्ती भेटत असतात. त्यापैकी काही लोक आपल्याला आठवत नाहीत. तर काही असे असतात जे कधी विसरत नाहीत. कारण, एखाद्या व्यक्तीचं व्यक्तीमत्व असं असतं की ते सर्व काही करत असतात. त्यांचे सर्वच गोष्टींत प्राविण्य असतं. अशाच आहेत आजच्या आपल्या नवदुर्गा गीता हासूरकर .

मी कोल्हापुरातल्या एका हॉस्पिटममध्ये गेले होते.तिथे बसली असताना एक जोडपं मला दिसलं. ते दोघेही वयस्कर होते अन् त्यांच्या कपड्यांवरून ते कुठल्यातरी खेड्यातील आहे हे कळत होतं. डोक्यावर पदर घेणारी ती बाई तिच्या हात फ्रॅक्चर झालेल्या पतीची सेवा करत होती. मला ती गोष्ट आवडली. पण तिच्या डोक्यावरचा पदर पडला अन् काळजात धस्स झालं.

Shardiya Navratri 2024
Navratri Colour 2024: नवरात्रीच्या पाचव्या दिवशी 'या' रंगाचे परिधान करा कपडे, देवी स्कंदमाता होईल प्रसन्न

त्या महिलेच्या डोक्यात जट होती. या जटेबाबत अनेक महिलांच्या भावना जोडलेल्या असतात. त्यामुळे मी सहज गप्पा मारायच्या म्हणून तिच्याशी त्या जटेबद्दल बोलले. तीही शांतपणे बोलत होती. म्हणाली, त्रास होतो याचा. मान अवघडते अन् झोपताही येत नाही नीट.

मी तयारच होते, पटकन बोले काढत का नाही मग. तेव्हा त्या म्हणाल्या की, कोणी काढायला येत नाही. पार्लरमध्ये जावं तर तिथल्या बायका आमच्या केसांना हात लावत नाहीत. तेव्हा लगेच मी म्हटलं, थांबा मी काढते.

मी लगेचच माझ्या सहकाऱ्यांना बोलावलं आणि त्या महिलेला हॉस्पिटल आवारातच जटामुक्त केलं. विशेष म्हणजे तिचा नवराही आमचे आभार मानत होता. हेच मी करते. मी आहे आजची दुर्गा गीता हसूरकर.

Shardiya Navratri 2024
Akola Navratri 2024 : आदीशक्तीचे चौदावे जागृत शक्तिपीठ ‘माता रुद्रायणी’, नवरात्रीत भाविकांची गर्दी

'एकदा मी मुलीसोबत कुठेतरी निघाले होते. रस्त्यावरच एक अगदी नुकतीच वयात आलेली मुलगी विवस्त्र पडली होती. माझी मुलगी मला म्हणाली, 'मम्मा बघ की ती मुलगी कशी कपड्याविना पडली आहे. मी तडक घरी जाऊन एक गाऊन घेऊन आले. तिला स्वच्छ केले आणि तो गाऊन तिला घातला. बहुतेक बराच वेळ तिनं काही खाल्लं नव्हतं. त्यामुळे तिला चक्कर आली होती.

तिला मी काहीतरी खायला दिले आणि नंतर पोलिस स्टेशनला फोन करून सांगितलं. त्यांनी सावली फाउंडेशनच्या केअर सेंटरचा फोन नंबर दिला. मी त्यांच्याशी बोलले. त्यांनी लगेच तिला 'सावली'त दाखल करुन घेतले. तेव्हापासून मनात एक रुखरुख होती. तळागाळातील लोकांपर्यंत सर्वकाही पोहोचलं पाहिजे.

Shardiya Navratri 2024
Navratri 2024 : ब्रह्मा, विष्णू आणि महेश देवांच्या शक्तींची देवता! तिसऱ्या माळेस सप्तशृंगगडावर आदिमायेच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

आपण यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत असंच वाटलं आणि मला समाजसेवा करण्याचं बळ मिळालं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीर्थ (अंनिस) कार्य करताना अनेक अडचणीवर मात करत त्यांनी साठहून अधिक महिलांना जटांमधून मुक्त केलं आहे.

आजपर्यंत समाजकार्य करताना त्यांना अनेकांकडून मदत झाली.  अनेकदा फोटोसेशनसाठी उच्यभ्रू  स्तरातून समाजसेवेचा दिखावा केला जातो, तो पाहून हसूरकर अस्वस्थ होतात. पण त्यांनी आपला समाजसेवेचा धर्म सोडलेला नाही. पतीच्या लिव्हर ट्रान्सप्लान्टसाठी मला दादरला जावे लागायचे.

Shardiya Navratri 2024
Jalgaon Navratri 2024 : दोन्ही गावांत एकाच देवीची घटस्थापना; बोरगाव येथे आठवड्याभर कीर्तन महोत्सवाचे आयोजन

महिन्यातून आठ-आठ तिथे दिवस रहावे लागायचे. या दरम्यान विविध अनुभवांना सामोरे जावे लागले. त्या सांगतात, मी किंवा आमचे कुटुंब हा औषधोपचाराचा खर्च कसाही निभावू शकतो. पण देशातील टाटा,केईएम सारख्या हॉस्पिटलमध्ये गरीब, असहाय्य रुग्ण येथे येतात, अक्षरशः रस्त्यावर राहून औषधोपचार घेतात. त्यांना भेटल्यानंतर मला असे वाटायचे की त्यांची दुःखे आपल्यापेक्षा खूप मोठी आहेत.

कोणी मदत करणारे नाही. मुंबईत कोणी नातेवाईक नाहीत, खायला-प्यायला काहीही नाही म्हणून मी जमेल तेवढी मदत करत असे. यातून मनात एक विश्वास निर्माण झाला की मी जी मदत करते आहे. या रुग्णांचा आशिर्वाद खरोखर माझ्या पतीला लाभेल. झालेही तसेच, इतक्या मोठ्या ऑपरेशननंतरही गीता यांचे पती आज ठणठणीत आहेत.

Shardiya Navratri 2024
Nashik Navratri 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुटुंबीयासमवेत आदिमायेच्या चरणी नतमस्तक

बीडवरून आले जोडपे

दोघे पती-पत्नी जट काढण्यासाठी वीडवरून कोल्हापुरात आले. गीता हसुरकर यांना भेटून पतीने पत्नीची जट काढण्याची विनंती केली. पत्नी मात्र जट काढू नका, घरात काही विपरित घडेल, असे सतत सांगत राहिली. पतीने हेका सोडला नाही. काही झाले तर मी पाहीन, असे ठासून सांगितले. गीता यांनी त्या महिलेचे समुपदेशन केले. जट काढतानाही महिलेच्या मनात शंका होत्याच. चार-पाच वर्षांपूर्वीची जट काही क्षणातच निघाली.

Shardiya Navratri 2024
Jalgaon Navratri 2024 : दोन्ही गावांत एकाच देवीची घटस्थापना; बोरगाव येथे आठवड्याभर कीर्तन महोत्सवाचे आयोजन

कौमार्य चाचणीबाबही केले प्रबोधन

कांजरभाट समाजातील कोमार्य चाचणी सारख्या अनिष्ट रूढी यांच्यावरती प्रबोधन करत या परंपरा थांबवण्यासाठीचे प्रयत्न केले. जात पंचायतीला मूठ माती याच्या वरती काम केले, समाजात वाळीत टाकले जाणाऱ्या कुटुंबाबरोबर आम्ही उभे राहून त्यांना न्याय देण्याचे काम केले, असे गीता यांनी सांगितले.

गीता सध्या कोल्हापूर पोलीस निर्भया पथक कोल्हापूर वुई केअर हेल्थलाईनच्या सदस्य, अंधश्रद्धा संघर्ष समिती, कोल्हापूरच्या जिल्हा कार्यवाहक आणि  हेल्पिंग हँडस फौंडेशन, तासगावच्या कोल्हापूर शाखेच्या अधक्ष्य आहेत.

गीता यांनी व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न, जातपंचायत विरोधात वाळीत टाकलेल्या लोकांना न्याय मिळवून देणे, जटा निर्मुलनाचे काम, रस्त्यावरील मनोरुग्ण आणि वयस्कर महिलांचे पुनर्वसन करण्यास मदत करणे, संविधान विषयी जनजागृती, कोल्हापूर जिल्हा डॉल्बीमुक्त करण्यासाठी प्रयत्न, डॉल्बीच्या आवाजाने जखमी झालेल्यांना मदत मिळवून देणे, अशी सामाजिक कार्ये केली आहेत.

त्याचसोबत बोगस डॉक्टरांविरोधात कार्य, अंधश्रद्धा आणि लैंगिक अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्याचे काम, कुपोषित मुलांना आधारासाठी आर्थिक मदत मिळवून देणे, समाजातील महिला, मुली आणि मुले असे ३ हजारहून जास्त लोकांचे समुपदेशन, सकाळ वर्तमानपत्राच्या तनिष्का व्यासपीठावरून प्लास्टिक मुक्तीचे प्रयत्न आणि जनजागृती, सॅनिटरी नॅपकीनविषयी दुर्गम भागात महिलांमध्ये जनजागृती करणे, मासिक पाळीविषयी माहिती देण्याच काम केले आहे.

Shardiya Navratri 2024
Navratri 2024 : कोकणातील या देवीच्या तलावात परडीतली फुलं होतात सोन्याची, आख्यायिकेत दडलंय गुपित!

गीता यांना  कोल्हापूर पोलीस निर्भया पुरस्कार, सातारा पोलीस निर्भया पुरस्कार,  कोल्हापूर वुई केअर हेल्थलाईन पुरस्कार, कोल्हापूर भगिनी महोत्सव पुरस्कार याहून अधिक पुरस्कारही मिळाले आहेत.

गीता हासूरकर यांचे काम खूप मोठे आहे. लोकही त्यांच्या या कामाचा सन्मान करतात. अन् गीता ताईही त्यांच्या कामाप्रती सर्वकाही प्रामाणिक आहेत. त्यांच्या या कार्याला आमचा सलाम!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.