कोणत्याही नात्यात प्रेम, जिव्हाळा, विश्वास आणि आदर असेल तर ते नातं दिर्घकाळापर्यंत टिकून राहतं असं म्हटलं जातं. मात्र, सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर या सगळ्या गोष्टी असतानादेखील अनेक जोडपी विभक्त divorce होताना दिसत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये घटस्फोटाच्या divorce प्रमाणात झपाट्याने वाढ झाली आहे. सध्या अनेक जोडपी वैचारिक मतभेदाचं कारण पुढे करुन विभक्त होताना दिसत आहेत. तसं पाहायला गेलं तर प्रत्येकाच्या घटस्फोट घेण्यामागे वेगवेगळी कारणं आहेत. मात्र, कारण काहीही असलं तरीदेखील या घटस्फोटाचा परिणाम केवळ दोन व्यक्तींवर नव्हे. तर, संपूर्ण कुटुंबावर होत असतो. त्यातच जर घरात लहान मुलं असतील तर त्यांच्या बालमनावर याचा जास्त परिणाम होतो. त्यामुळे जर घटस्फोट घेण्याचा विचार सुरु असेल तर प्रथम मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्या मनाची समजूत काढणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच घटस्फोटाविषयी मुलांना नेमकं कसं समजवावं ते जाणून घेऊयात. (shield-your-child-from-the-effects-of-divorce)
१.मुलांपासून काही लपवू नका -
तुमचा घटस्फोट घेण्याचा निर्णय फायनल झाला असला तरीदेखील मुलांची जबाबदारी ही आई व वडील दोघांचीही असते. त्यामुळे तुमच्या वैचारिक, शाब्दिक वादांमध्ये मुलांना कधीही मध्ये आणू नका. परंतु, तुम्ही लवकरच विभक्त होणारा आहात हे मुलांना विश्वासात घेऊन सांगा. जर तुम्ही मुलांपासून एखादी गोष्ट लपवत असाल तर त्यांच्या मनात तुमच्याविषयी गैरसमज निर्माण होऊ शकतो. तसंच जरी तुम्ही विभक्त होत असलात तरीदेखील पालकांची जबाबदारी आणि प्रेम याच्यात कुठेच कमी पडणार नाही असा विश्वास त्यांच्या मनात निर्माण करा.
२. मुलांच्या शंकांचं निरसन करा -
तुमच्या घटस्फोटाचा निर्णय मुलांना पटेलच असं नाही. कदाचित मुलं त्याला विरोध करतील किंवा अनेक प्रश्न तुमच्या समोर उपस्थित करतील. पण, त्यावेळी मुलांवर चिडू किंवा रागवू नका. मुळात तुमच्या निर्णयामुळे मुलांना मानसिक धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याशी वाद घातल्यामुळे किंवा ओरडल्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर अधिक परिणाम होऊ शकतो. तसंच ते तुमच्यापासून दुरावण्याचीही शक्यता वाढू शकते. मुलं तुम्हाला अनेक प्रश्न विचारु शकतात. त्यामुळे त्यांना नेमकं कसं समजवायचं याची आधीच पूर्वतयारी करुन ठेवा. मुळात मुलांना कधीच अंधारात ठेवू नका. त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधा.
३. घटस्फोटानंतर पार्टनरविषयी वाईट बोलू नका -
घटस्फोट झाल्यानंतर मुलांचा ताबा आई किंवा वडील यापैकी एकाकडे जातो. मात्र, मूल कोणाकडेही असलं तरीदेखील आपल्या एक्स पार्टनरची मुलांसमोर निंदा करु नका. तुमचं आणि त्यांचं नातं कितीही खराब असलं तरीदेखील मुलांसोबतचं त्यांचं नातं बिघडू देऊ नका. मुलांना त्यांच्या आई-वडिलांची केलेली निंदा जराही सहन होत नाही. त्यामुळे मूल तुमच्यापासूनही दुरावण्याची शक्यता असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.