Skin Care Routine : टॉयलेट सीट पेक्षाही घाण असतात मेकअप ब्रश! संशोधनात धक्कादायक दावा...

या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, मेकअप ब्रश टॉयलेट सीटपेक्षा जास्त घाण असतो
Skin Care Routine
Skin Care Routine esakal
Updated on

Skin Care Routine : मेकअप लावण्यासाठी ब्रश ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या मेकअप किटमध्ये किती प्रकारचे ब्रश असावेत आणि हे ब्रश कसे वापरावेत हेही आपल्याला अनेक वेळा माहीत नसते. पण तुम्हाला माहित आहे का मेकअप ब्रश तुमच्यासाठी किती धोकादायक असू शकतात? मेकअप ब्रशच्या संदर्भात एक अतिशय धक्कादायक अभ्यास समोर आला आहे. या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, मेकअप ब्रश टॉयलेट सीटपेक्षा जास्त घाण असतो.

मेकअप ब्रश किती धोकादायक आहेत?

स्पेक्ट्रम कलेक्शनने हे संशोधन केले आहे. त्यांच्या नवीन संशोधनानुसार, मेकअप ब्रश व्यवस्थित साफ न केल्यामुळे त्यामध्ये धूळ, घाण, ऑइल आणि बॅक्टेरिया जमा होण्याचा धोका असतो. मेकअप ब्रश वापरल्यानंतर त्यामध्ये बॅक्टेरियाची संख्या टॉयलेट सीट एवढी किंवा त्यापेक्षा जास्त असते. अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की मेकअप ब्रश कुठेही ठेवले तरी ते घाण असताना त्यात बॅक्टेरियाचे प्रमाण वाढल्याने धोका निर्माण होऊ शकतो.

Skin Care Routine
Skin Care : उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल ?

संशोधनात स्वच्छ आणि फाउंडेशनने वापरलेले असे दोन ब्रशचे संच समाविष्ट करण्यात आले. दोन आठवड्यांनंतर, जेव्हा दोन ब्रशची तुलना केली गेली, तेव्हा गलिच्छ ब्रशमध्ये बॅक्टेरियाचे प्रमाण टॉयलेट सीटपेक्षा जास्त होते. त्याच वेळी, न वापरलेल्या मेकअप ब्रशमध्ये खूप कमी बॅक्टेरिया होते. जर तुम्ही बराच वेळ ब्रश साफ केला नाही तर तो लवकरच खराब होईल. घाणेरडे मेकअप ब्रशमुळे पिंपल्स आणि पुरळ येऊ शकतात.

Skin Care Routine
Summer Skin Care: रखरखत्या Summer मध्ये त्वचा करपलीय, मग या मातीचा थंड लेप करेल त्वचेचं संरक्षण...

ब्रश कसा स्वच्छ करावा

प्रथम ब्रश मऊ कापडाने स्वच्छ करा, जेणेकरुन मेकअप निघून जाईल.

तुम्ही एका भांड्यात कोमट पाणी घेऊन शॅम्पूच्या मदतीने ब्रशच्या ब्रिस्टल्स स्वच्छ करु शकता.

तुम्ही ब्रशची टीप कोमट किंवा साध्या पाण्याने पूर्णपणे स्वच्छ करु शकता

पाणी स्वच्छ होईपर्यंत ब्रश स्वच्छ करा

ब्रश धुतल्यानंतर नीट वाळवा, जेणेकरुन त्यात ओलावा राहणार नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.