Shopping Tips: शॉपिंग करताना वापरा 'या' स्मार्ट ट्रिक्स, पैशांची होईल बचत

Shopping Tips: शॉपिंग करण्यापूर्वी तुम्हाला बाजाराबद्दल पुढील गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे.
Shopping Tips: शॉपिंग करताना  पैसे कसे वाचवाल? जाणून घ्या सोप्या टिप्स
Shopping Tips: Sakal
Updated on

shopping tips follow these tips for bargaining while shopping

सर्वांना कमी किमतीत चांगल्या वस्तूंची शॉपिंग करायला आवडते. यासाठी विविध प्रकारच्या बाजारात जाणेही आवडते. भाव करणे ऑनलाइन शक्य नाही आणि त्यासाठी ऑफलाइन मार्केटमध्ये जावे लागते.

शॉपिंग करताना पैसे वाचवण्यासाठी भाव कसा करावा हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. भाव करताना अनेक गोष्टींची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असते. या गोष्टी कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.

  • किंमतींची तुलना करा

कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी, आपण त्याची गुणवत्ता आणि किंमतीनुसार तुलना केली पाहिजे. यासाठी जवळपासच्या इतर दुकानात जाऊन त्याच वस्तूंच्या किमती विचारा आणि त्यांची आपापसात तुलना करा. असे केल्याने तुम्हाला गुणवत्तेची तसेच योग्य किंमतीची कल्पना येऊ शकेल. अशा प्रकारे, तुम्ही योग्य दुकानातून भाव करून तुमच्या आवडीच्या वस्तू खरेदी करू शकाल. यामुळे तुमच्या पैशाची बतच देखील होईल.

  • वस्तूबद्दल आवड दाखवू नका

तुम्हाला एखादी वस्तू आवडली असे सुरुवातीलाच सांगितले तर दुकानदार याचा फायदा घेऊ शकतो. कारण आता त्याला हे देखील माहित आहे की आपण कोणत्याही किंमतीत आपली आवडती वस्तू विकत घ्याल. त्यामुळे अगदी सुरुवातीपासूनच दाखवावं लागतं की मिळालं तर ठीक नाहीतर दुसरं कुठून तरी विकत घ्याल. असे केल्याने तुम्ही दुकानदाराशी सहज भाव करू शकाल आणि तुमच्या आवडीची वस्तू खरेदी करू शकाल.

Shopping Tips: शॉपिंग करताना  पैसे कसे वाचवाल? जाणून घ्या सोप्या टिप्स
Summer Care: उन्हाळ्यात जीवनशैलीत करा'हे' छोटे-छोटे बदल; एसीशिवायही मिळेल थंडावा.. वाचा सोप्या टिप्स
  • मार्केटबद्दल जाणून घ्या

कोणत्याही ठिकाणाहून शॉपिंग करण्यासाठी तुम्ही आधी त्या मार्केटबद्दल माहिती जाणून घेतली पाहिजे.

प्रत्येक दुकानात किंवा प्रत्येक बाजारात तुम्हाला शॉपिंग करता येईलच असे नाही.

तुम्ही स्ट्रीट शॉपिंग करताना भाव करू शकता.

शॉपिंग करताना केवळ किंमत बघू नका. वस्तूची गुणवत्ताही लक्षात ठेवा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.