Shopping Tips : विकेंडला शॉपिंग प्लॅन करताय; या टिप्स करतील वायफळ खर्च कमी अन् वेळेची बचत

खरेदी करताना आपण डोळे मिटून आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करतो
Shopping Tips
Shopping Tips esakal
Updated on

Shopping Tips : सुट्टीच्या दिवशी हमखास शॉपिंग आणि डिनरचे प्लॅन्स केले जातात. कारण, आठवड्याभरात ऑफिसमुळे वेळ नाही मिळत. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी एकमेकांसोबत बोलणं, गप्पा गोष्टी करणं खरेदीला जाणं हे केलंच जातं. पण घाईघाईत शॉपिंग करण्याच्या नादात अनेक वस्तू राहून जातात. किंवा त्याची क्वालिटी चेक केली जात नाही.

Shopping Tips
Shopping Tips : ओरिजनल लेदरची बॅग कशी ओळखावी?

खरेदी करताना आपण डोळे मिटून आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करतो. त्यामुळे आपला बराचसा पैसा खर्च होतो. आणि बजेट नेहमीच बिघडते. पण कमी पैशात चांगली शॉपिंग कशी करायची हे समजत नाही. त्यामूळे आज अशा काही टीप्स पाहूयात ज्या तूम्हाला शॉपिंग करण्यासाठी फायदेशीर ठरतील.

Shopping Tips
Marriage Shopping : लग्नासाठी पोशाख खरेदी करताना या गोष्टी लक्षात घ्या

यादी बनवा

तूम्ही खरेदीला जाण्याचा विचार करता तेव्हा सर्वात आधी खरेदीची यादी तयार करा. तूम्हाला काय आणि किती खरेदी करायचे हे आधीच ठरवले पाहिजे. कारण अनेकदा आपण बाजारात जाऊनही आपल्या गरजेच्या वस्तू विसरतो. त्यामूळे त्यावस्तूसाठी पूढील सुट्टीची वाट पहावी लागते. सामानाची यादी बनवल्याने तूमचा वेळ वाचतो. आम्हाला काय हवे आहे ते कळते त्यामूळे वेळ वाया न घालवता लागणाऱ्या गोष्टी पटपट उचलल्या की झाली तूमची शॉपिंग. यामूळे तूमचे पैसेही वाचतील.

Shopping Tips
Online Shopping : ...म्हणून Amazon-Flipkart वर स्वतात मिळतात अनेक गोष्टी

घाई करू नका

अनेकवेळा आपण अगदी घाईघाईत शॉपिंग करतो. त्यामुळे लागणाऱ्या वस्तू तपासून घ्यायला वेळ मिळत नाही. हि एक मोठी चूक आहे. कारण अशी घाईघाईत खरेदी करण्याने आपले नूकसानच करू शकते.कपडे खरेदी करताना आवडलं म्हणून दिसताच क्षणी उचचलं जातं. पण, नंतर ते एकदाच घालून फेकून दिले जाते. त्यामुळे आपले पैसेही वाया जातात. म्हणूनच खरेदी घाईत करू नये.

Shopping Tips
Winter Shopping : थंडी वाढताच उबदार कपडे खरेदीसाठी गर्दी

खरेदीला जाण्याआधी कपाट चेक करा

कपड्यांची खरेदी करताना तूम्हाला आवडत असलेली डिझाईन आणि रंग निवडा. एखाद्याच्या अंगावर पाहिलेले रंग तूम्हालाही सूट होतील असे नाही. त्यामूळे असे कपडे वाया जातात. स्पेशली एखादा स्टोल किंवा ओढणी घेणार असाल तर एकदा तुमचा वॉर्डरोब तपासून बघा की तुमच्याकडे तशीच ओढणी आहे का? कारण अनेकवेळा दोन दोन ओढण्या कपाटात असतात. पण, वापरल्या जात नाहीत. तिथे तूमचे खरेदीचे बजेट वाढू शकते.

Shopping Tips
Diwali Shopping : बांगड्यांची किणकिण यंदाच्या दिवाळीत क्षीण

कपड्यांची खरेदी नीट तपासून करा

कपड्यांची खरेदी करताना, त्याचा रंग, प्रिंट अशी असावी की ते एका धूण्यात खराब होणार नाहीत. तसेच, तुम्ही जे कापड खरेदी करणार ते कॉटन, टेरीकॉट, सिल्क, बनारसी कोणतेही असले तरी त्याची चांगली समज असेल तरच घ्या. नाहीतर आता बाजारात मिक्स कापड विकले जाते. यामूळे आफण फसले जातो.

Shopping Tips
Online Shopping : ऑनलाइन विक्री करणाऱ्यांनो सावधान

कॉटनच्या कापडाचा रंग जातो, ही टीप करेल मदत

कॉटनचे कपडे निवडले तर अनेकदा त्याचे रंग निघून जातो. अशावेळी तुम्ही ते कपडे धुण्यापूर्वी काही काळ मिठाच्या पाण्यात भिजवून मग वापरू शकता. यामूळे कापडाचे रंग टिकून राहतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.