Sex During Periods : मासिक पाळीमध्ये सेक्स करावा का? तज्ज्ञ सांगतात...

बहुतेक महिलांना या काळात शरीरसंबंध ठेवायला संकोच वाटतो
Sex During Periods
Sex During PeriodsEsakal
Updated on

मासिक पाळीच्या काळात शारीरिक संबंध ठेवणं योग्य आहे की नाही असा प्रश्न खूप लोकांना पडतो. अनेक जण सांगतात की मासिक पाळीच्या काळात संबंध ठेवू नये, शिवाय महिलांनाही मासिक पाळीच्या काळात संबंध ठेवताना संकोच वाटतो. मात्र याबाबत तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घ्या.

तज्ज्ञांच्या मते, मासिक पाळीच्या काळात शरीरसंबंध ठेवण्यासाठी हरकत नाही. मात्र या काळात आवश्यक ती काळजी घ्यायला हवी. तज्ज्ञ सांगतात की, मासिक पाळी दरम्यान शरीर संबंध ठेऊ नये असं नाही. उलट महिलांना या काळात शरीर संबंध ठेवणं अधिक सुखकर ठरू शकतं. फक्त या काळात आवश्यक काळजी घ्यायला हवी.

हे ही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

मासिक पाळीदरम्यान शरीरसंबंध ठेवण आरामदायी ठरू शकतं. यामुळे स्त्रीयांमधील क्रॅम्प्सपासून कमी होऊ शकतात. शरीरसंबंध ठेवल्यामुळे हार्मोन, एंडोर्फिन आणि स्ट्रेस बस्टिंग केमिकल्स तयार होतात. हे केमिकल्स मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास कमी करू शकते.

मासिक पाळीदरम्यान, महिलांना पोटाचा त्रास सुरू होतो. शरीरसंबंध ठेवल्यामुळे हा त्रास कमी होण्यास मदत होते.तर मासिक पाळी दरम्यान शरीरसंबंध ठेवताना कंडोमचा वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. मासिक पाळीदरम्यान, इन्फेक्शनपासून बचावासाठी कंडोमचा वापर करणे योग्य ठरते.

Sex During Periods
Intimate Relationमुळे तरुणींमध्ये वाढतोय कँसरचा धोका, तिशीतल्या तरुणींनी वेळीच सावध व्हा नाहीतर...

मासिक पाळीदरम्यान महिला चिडचिडपणा करतात. तर आधी त्यांना या अवस्थेत आणि या काळात संबध ठेवताना संकोच वाटत असेल तर संबध ठेवणे टाळा. तुमच्या पार्टनरला समजून घेऊन तुम्ही संबध ठेवायचे की नाही ते ठरवा. आवश्यक असल्यास आपल्या जवळच्या डॉक्टरांशी बोला.

Sex During Periods
Fashion Trends 2023 : वर्षभर चालणार या साड्यांचं ट्रेंड, तेव्हा संक्रांतीसाठी आजच खरेदी करा हटके साड्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.