Shravan 2023 : शिवलिंगावर आज करा रुद्राभिषेक, अनेक संकटांतून मिळेल मुक्ती!

रुद्राभिषेक तुम्हाला अनेक संकटांतून मुक्ती देणारा ठरू शकतो.
Shravan 2023
Shravan 2023esakal
Updated on

Shravan 2023 : आपल्या रोजच्या आयुष्यात टेन्शन प्रत्येकाला येतं. कधी कामाचे तर कधी घरातल्या कटकटीचे. काही लोकांच तर असं म्हणणं असतं की, आमच्या आयुष्यात काहीच सुरळीत नाहीय, घरी जायची इच्छाच होत नाही. याचा थेट परिणाम तुमच्या कामावर आणि मनस्थितीवरही होतो.

काही कुंडलीतील दोष असू शकतात. तर काहीवेळा वास्तूदोषांचाही हा परिणाम असू शकतो. अशावेळी श्रावण महिन्यात काही उपाय केल्याने तुमच्या जीवनातील संकटे दूर होऊ शकतात.

हिंदू लोकांसाठी श्रावण हा पवित्र महिना आहे. श्रावणात अनेक शुभ काम केली जातात. श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी महादेवांची पूजा केली जाते त्यांना अभिषेकही घातला जातो. आजच्या दिवशीच तुम्ही महादेवांना घातलेला रुद्राभिषेक तुम्हाला अनेक संकटांतून मुक्ती देणारा ठरू शकतो. (Shravan 2023)

Shravan 2023
Shravan Somvar 2023: आजच्या श्रावणी सोमवार निमित्त ही शिवामूठ करा अर्पण; जाणून घ्या

रुद्राभिषेक का करावा?

  1. वास्तुतील दोष व कलह संपावेत म्हणून

  2. सर्व विघ्ने दूर व्हावीत यासाठी

  3. सर्व रोग नाहिसे होऊन दिर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी

  4. विद्या व लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी

  5. मनातील ईच्छा पूर्ण होण्यासाठी

  6. श्रीशिवाचे आशिर्वाद मिळविण्यासाठी

Shravan 2023
Shravan Somwar 2023 : आज संध्याकाळीच महादेवांना करा या फळाचा अभिषेक, लवकरच लग्नाची सुपारी फुटेल

रुद्रसूक्त हे त्या भद्र रुपाला प्रसन्न करण्यासाठी आहे. रुद्र हा अग्नी स्वरुप आहे तसेच जल स्वरुप आहे. तो पंच महाभुतांचा अधिपति आहे. रुद्र हा नागर संस्कृतिच्या आधीपासून सनातन धर्मात अस्तित्वात आहे.

रुद्र मंत्र- ॐ नमः भगवतेः रुद्राय

रुद्राभिषेक पूजा सामग्री काय आहे

गायीचे शुद्ध तूप, विड्याचे पाने, फूल, चंदन, धूप, गंध, कपूर, बेलपत्र, मिठाई, फळे, मध, दही, ताजे दूध, गुलाब जल, मेवा, पंचामृत, नारळ पाणी, ऊसाचा रस, चंदन पाणी, गंगाजल, सुपारी आणि नारळ.

Shravan 2023
Shravan Somwar 2023 : महादेवांचा महिमा अगाध, भारतातलं असं मंदिर जे दिवसातून दोनवेळा होते अदृष्य

रुद्राभिषेक करण्यासाठी शिवलिंग उत्तर दिशेला ठेवावे. अभिषेक करणाऱ्या व्यक्तीने आपले मुख पूर्व दिशेला असेल अशा स्थितीत बसावे. सर्वात आधी अभिषेक करणाऱ्या व्यक्तीने शिवलिंगपर गंगाजल टाकवे. अभिषेकाला सुरुवात करावी.

रुद्राभिषेकादरम्यान, महामृत्युंजय मंत्र, शिव तांडव स्तोत्र, शिव पंचाक्षर मंत्र (नमः शिवाय) किंवा रूद्र मंत्राचा जप करावा. पूजा करताना शिवलिंगावर चंदनाचा लेप लावावा. बेलपत्र, सुपारी आणि इतर पूजा सामग्री शिवलिंगावर अर्पण करावी. शिवशंकराला नैवेद्य दाखवावा आणि मनोइच्छित फळ मागावे.

कधी करतात रुद्राभिषेक

भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी रुद्राभिषेक ही प्रभावी पूजा आहे असे मानले जाते. असं मानलं जातं की शिवालया रुद्राभिषेक केल्याने त्याचा प्रभाव लवकर जाणवतो. यामुळे सर्व मनोरथ पुर्ण होतात. हा अभिषेक महाशिवरात्री, प्रदोष किंवा श्रावणी सोमवार असताना केल्यास त्याचा विशेष लाभ होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.