Shravan 2023 : लाख परीक्षा घेतल्या पण माता पार्वती मागे हटल्या नाहीत; जाणून घ्या शिव-पार्वती विवाहाची ही अनोखी कथा!

माता सती कोण होत्या?
Shravan 2023
Shravan 2023 esakal
Updated on

Shravan Month 2023 :तुमच्या घरातही एखादी उपवर मुलगी असेल. तुम्ही तिच्या लग्नाची घाई करत असाल. आणि तिने निवडलेला वर तुम्हाला पसंत नसेल. तर, संपूर्ण घरदार मुलीला त्या मुलाबद्दल वाईट गोष्टी सांगत असतं. त्याची लक्षणं ठिक नाहीत, तो असाच राहतो, तो तसाच राहतो अशा गोष्टी त्या मुलीला ऐकवल्या जातात. पण तरीही ती मुलगी ठाम राहिली तर त्यांचा विवाह होतो.

अगदी असाच काहीसा किस्सा भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या विवाहारम्यान घडला होता. शिवपुराणात याबाबत सांगण्यात आले आहे. श्रावणाच्या या पवित्र महिन्यात आपण या खास गोष्टीविषयी जाणून घेऊयात.

हिंदू धर्मात भगवान शिवाला देवांचे देव महादेव म्हटले गेले आहे. तसेच, त्याला प्रसन्न करणे सोपे मानले जाते, म्हणून त्याला भोलेनाथ असेही म्हणतात. परंतु माता सती आणि नंतर तिचे दुसरे रूप माता पार्वतीने भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. माता पार्वतीने कठोर तपश्चर्या करून भगवान शिवाला कसे प्रसन्न केले ते जाणून घेऊया.

Shravan 2023
Shiva Avatar : एआयने तयार केले महादेवाचे अवतार, पाहा फोटो

माता सती कोण होत्या

माता सती या भगवान शिवाची पहिल्या पत्नी आहेत. त्या प्रजापती दक्षाची कन्या होत्या. राजा दक्षाने आपल्या तपश्चर्येने देवी भगवतीला प्रसन्न केले, त्यानंतर माता भगवतीने त्यांच्या घरी सतीच्या रूपात जन्म घेतला. देवी भगवतीचे रूप असल्याने, दक्षाच्या सर्व मुलींमध्ये सती ही सर्वात अलौकिक होती.

माता सती लहानपणापासूनच शिवभक्तीत मग्न होती. सतीने भगवान शंकरच पती म्हणून मिळवण्यासाठी मनापासून भगवान शंकराची पूजा केली. त्याचेही फळ त्यांना मिळाले आणि त्यांना शिव पती म्हणून मिळाला.

सतीने आपल्या प्राणांची आहुती दिली

राजा दक्षने त्याला आपल्या मुलीसाठी योग्य वर मानले नाही. आई सतीने वडील दक्ष यांच्या विरोधात जाऊन भगवान शिवाशी विवाह केला. द्वेषामुळे दक्षाने भगवान शिव आणि माता पार्वतीला यज्ञात आमंत्रित केले नाही आणि भगवान शंकराचा अपमानही केला, यामुळे माता सतीने यज्ञस्थळी प्राणत्याग केला. (Shravan)

Shravan 2023
Lord Shiva Temples: महाराष्ट्रातील 12 प्रसिद्ध शिव मंदिरे

पार्वतीचा जन्म कसा झाला

माता सतीने आपल्या देहाचा त्याग करताना संकल्प केला होता की, मी राजा पर्वतराजाच्या पोटी जन्म घेऊन शंकरांची पुन्हा पत्नी होईन. यानंतर पर्वतराज हिमालयाची पत्नी मेनका हिच्या पोटी माता सतीचा जन्म झाला.

पर्वतराजाची कन्या असल्याने तिला 'पार्वती' म्हणत. पार्वती भगवान शिवाला तिचा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करण्यासाठी वनात गेली. अनेक वर्षांच्या कठोर उपवास आणि कठोर तपश्चर्येनंतर भगवान शिव तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले.

Shravan 2023
Lord Shiva Temple : आशियातील सर्वात मोठं शिवलिंग कुठे आहे?

भगवान शंकरांनीच घेतली पार्वतीची परीक्षा

तपश्चर्येदरम्यान भगवान शंकरांना पार्वतीची परीक्षा घ्यायची होती. त्यांनी सप्तऋषींना पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी पाठवले. ते पार्वतींकडे गेले आणि तिला समजावण्याचा प्रयत्न केला की शिवजी हे अशुभ पोशाख आणि जटाधारी आहे, ते नेहमी जंगलात राहतात, काहीही खातात, असभ्य राहतात. त्यांच्याशी लग्न करण्याचा विचार सोडून दे, असे ऋषींनी पार्वती मातेला समजावले.

त्यांच्याशी लग्न करून तुम्ही कधीही आनंदी होऊ शकत नाही. तसेच माता पार्वतीला ध्यान सोडण्यास सांगितले. पण पार्वती आपल्या विचारांवर ठाम राहिली. त्यांचा दृढनिश्चय पाहून सप्तर्षी खूप प्रसन्न झाले.

त्यांना यश मिळवण्यासाठी आशीर्वाद देऊन भगवान शंकरांकडे परतले. पार्वतीच्या निश्चयामुळे आणि त्यांनी केलेल्या साधनेमुळेच पार्वती माता आणि भगवान शंकरांचा विवाह सोहळा थाटात पार पडला होता. (Lord Shiva)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.