श्रावण महिना हिंदू धर्मात पवित्र मानला जातो. या महिन्यात अनेक व्रत वैकल्य केली जातात. श्रावणात संपूर्ण महिना उपवास करणारे अनेक लोक आहेत. तर, काही लोक श्रावणातील सोमवार,मंगळवार, गुरूवार,शनिवारीच उपवास करतात. त्यामुळे उपवासाच्या पदार्थांची रेलचेल श्रावणात असते.
साबुदाण्याची खिचडी, वडे, राजगीरा लाडू आणि बरेच गोड,तिखट, चटपटीत पदार्थ तुमच्या उपवासाची चव वाढवतात. लवकरच श्रावण महिन्याला सुरूवात होणार आहे. त्यामुळ महिलांची लगबग सुरू असेल. अनेक घरात डिंकाचे लाडू, शिंगाड्याच्या वड्या, खोबऱ्याच्या वड्या बनवल्या जातात.
आज आम्ही तुम्हाला साबुदाण्याचे लाडू कसे बनवायचे हे सांगणार आहोत. ते तुम्ही उपवासादिवशी खाऊ शकता आणि ते पौष्टीकही असतात. साबुदाण्याचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहीत्य पाहुयात.
साबुदाण्याचे लाडू कसे बनवायचे
साहीत्य –
साबुदाणा पीठ १ वाटी
पाऊन वाटी पिठीसाखर
वेलदोड्यांची पूड
अर्धी वाटी तूर
कृती
साबुदाण्याचे पीठ, वेलदोडे पूड आणि बारीक साखर मोठ्या परातीत एकजीव करावी. यावर पातळ तूप घालावे आणि लाडू वळावेत. साबुदाण्याचे लाडू पांढरेशुभ्र दिसतात.
एका वाटीच्या प्रमाणात ६-७ लाडू होतात. ताजे ताजे लाडू चविष्ट लागतात. आणि उपवासादिवशी खाण्यासाठी पौष्टीकही असतात.
एक किलो साबुदाणा घेऊन त्याला पाण्याचा हात लावून घ्या. यानंतर चमचाभर तुपात साबुदाणा गुलाबी रंगावर परतून घ्या. साबुदाणा भाजत असताना तो सतत हलवावा लागतो. नाहीतर तळाला चिटकून करपतो. साबुदाणा भाजून झाल्यावर त्याचे पीठ दळून आणावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.