Shravaan Vastu Tips: श्रावणात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी फॉलो करा 'या' वास्तू टिप्स

Shravaan Vastu Tips: श्रावणात भोलेनाथाला प्रसन्न करण्यसाठी पुढील वास्तू टिप्स फॉलो कराव्या.
Shravaan Vastu Tips
Shravaan Vastu TipsSakal
Updated on

Shravaan Vastu Tips: वास्तूशास्त्रात सुख-शांतीसाठी अनेक नियम सांगितलेले आहेत. हे नियम पाळल्यास घरात सकारात्मक वातावरण राहील. आता काही दिवसामध्ये श्रावण महिना सुरू होणार आहे. या दिवसांमध्ये शिवभक्त भोलेनाथाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. यासाठी देखील वास्तूशास्त्रात काही नियम सांगितलेले आहे. पुढील नियमांचे पालन केल्यास महादेव प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण होतील.

योग्य दिशा कोणती

श्रावणात तुमच्या घरात शिवलिंगाची स्थापना करायची असेल तर त्यासाठी ईशान्य कोपरा उत्तम राहील. या दिशेला देवी-देवतांचा वास असतो अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिशेला मंदिर बांधून तेथे शिवलिंगाची स्थापना करून पुजा करू शकता.

फोटोची योग्य दिशा

वास्तूनुसार शिवकुटुंबाचा फोटो घराच्या उत्तर दिशेला लावणे शुभ मानले जाते. यामुळे भगवान शिवाची कृपा कायम तुमच्यावर राहते. तसेच श्रावणात आंब्याच्या पानांचा हार घालून मंदिर सजवू शकता. यामुळे घरात सकारात्मक वातावरण राहते. तसेच महादेवाला प्रिय असलेले बेलाचे पान अर्पण करावे.

Shravaan Vastu Tips
Shravaan Month: श्रावणात सोमवारी 'या 'गोष्टी घरी आणा, महादेवाची कायम राहील कृपादृष्टी

करा या गोष्टी

श्रावणात मुख्य दारावर रोज गंगाजल शिंपडावे. यासोबतच मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक काढावे. त्याचबरोबर घरी शमीचे लावणे शुभ मानले जाते. यामुळे घरातील आर्थिक समस्या दूर होतात.

पुढील चुका टाळा

घरात शिव तांडव मुद्रा किंवा भगवान शिवाच्या क्रोधाचा फोटो लावणे टाळावे. श्रावणात घराच्या आणि मंदिराी स्वच्छता ठेवावी.कारण त्याचा तुमच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.