स्कंद पुराणानुसार भगवान शंकरांचा आवडता महिना म्हणजे श्रावण, सणांचा महिना अशी ओळख असणारा श्रावण हे एकाअर्थी उत्साहाचे, चैतन्यचे प्रतीक मानला जातो, पण यातही शिवभक्तांसाठी श्रावणी सोमवारचे महत्त्व असते.
श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगवेगळे आहेत. मात्र, यातील सर्वांत महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार. श्रावण हा महादेवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा, पवित्र आणि शुभ मानला जातो. श्रावणातील सोमवारी शंकराच्या पूजेनंतर शिवामूठ वाहतात.
आजची शिवमुठ कोणती आहे ?
आज श्रावणातील दुसऱ्या श्रावणी सोमवारी आजच्या दिवशी भगवान महादेवाला तीळाची शिवमूठ अर्पण करावी.
शिवमूठ वाहताना म्हणायचा मंत्र
‘नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।’ असा मंत्र म्हणावा. पाच वर्षांनंतर व्रताचे उद्यापन करावे. यथाविधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन, भेटवस्तू, दक्षिणा देऊन या व्रताची समाप्ती करावी, असे म्हटले जाते.
श्रावणी सोमवारी शिवपूजनासाठी भगवान शंकराच्या आवडत्या गोष्टी म्हणहेच बेलाचे पान, पंचामृत, धोत्रा, चंदन, अक्षता अर्पण केल्या जातात तर तूप व साखरेचा नैवैद्य दाखवला जातो. अनेक शिवभक्त हे एकवेळ भोजन करून श्रावणी सोमवारचा उपवास देखील करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.