Shri Lanka Visa Free: श्रीलंकेचा सांस्कृतीक वारसा अन् निसर्गसौंदर्य अनुभवा! 1 ऑक्टोबरपासून करता येणार व्हिसा फ्री प्रवास

भारताच्या लगतचा देश श्रीलंका एक बौद्ध वारसास्थळ आहे. इथं समृद्ध सांस्कृतीक वारसा अन् चारही बाजूनं विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला आहे.
Shri Lanka
Shri Lanka
Updated on

नवी दिल्ली : भारताच्या लगतचा देश श्रीलंका एक बौद्ध वारसास्थळ आहे. इथं समृद्ध सांस्कृतीक वारसा अन् चारही बाजूनं विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळं मोठी निसर्गसंपदा, बीचेस अन् अनेक जुने पॅगोडा या ठिकाणी पहायला मिळतात. पर्यटनासाठी हा देश एक सर्वोत्तम पर्याय मानला जातो. भारतीयांना अगदी जवळचा चांगला पर्यटनाचा पर्याय म्हणूनही श्रीलंकेकडं पाहिलं जातं. याच श्रीलंकेत जाण्यासाठी १ ऑक्टोबरपासून भारतीयांना मोफत व्हिसा उपलब्ध होणार आहे. त्यामुळं ज्यांना श्रीलंकेची सफर करायची आहे त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे.

Shri Lanka
Shri Lanka Crisis: पळून गेलेले माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे देशात परतले!

श्रीलंकेची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून आहे. पण गेल्या वर्षी राजकीय अस्थिरतेमुळं या देशाला मोठा फटका बसला होता. पण आता हा देश पूर्वपदावर आला आहे. त्यामुळं इथल्या सरकारनं आपल्या देशातील पर्यटनाला बुस्ट मिळावं यासाठी प्रयत्न सुरु कले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून श्रीलंकेनं जगभरातील ३५ देशांसाठी मोफत व्हिसाची योजना सुरु केली आहे. यामध्ये भारतासह युके आणि युएसए अर्थात अमेरिकेचाही समावेश आहे.

Shri Lanka
Amazon Prime Free : ॲमेझॉन प्राईमवर पैसे खर्च न करता एंटरटेनमेंट हवंय? फ्रीमध्ये मिळणार सबस्क्रिप्शन, वापरा 'या' स्मार्ट ट्रिक्स

श्रीलंकन सरकारनं ऑक्टोबर २०२३ पासून मोफत व्हिसाचा प्रोजेक्ट लॉन्च केला. त्यानुसार ७ देशांतील नागरिकांना मोफत व्हिसा उपलब्ध करुन देण्यात येणार होता. यामध्ये भारत आणि चीनचा समावेश होता. या प्रकल्पाला मोठं यश मिळाल्यानंतर श्रीलंकन सरकारनं ही योजना आणखी देशांसाठी राबवण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला. त्यानुसार श्रीलंकेनं आता ३५ देशांसाठी १ ऑक्टोबरपासून मोफत व्हिसा प्रवेश सुरु केला आहे.

Shri Lanka
International Coffee Day 2024: कॉफीच्या माध्यमातून या स्त्रीने घेतली उद्योगभरारी, नवऱ्याच्या आकस्मिक मृत्यूनंतरही सोडली नाही जिद्द..

भारतीय प्रवाशांसाठी श्रीलंकेचं हे धोरणं खूपच महत्वाच आहे. कारण पर्यटनासाठी श्रीलंकेत जाणाऱ्यांमध्ये भारतीय नागरिक सर्वाधिक आहेत. २०२३ मध्ये २,४६,००० भारतीयांनी श्रीलंकेला भेट दिली होती. आत्ताच्या मोफत व्हिसाच्या धोरणामुळं ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसंच यानिमित्त भारतीयांना देखील श्रीलंका हा संपूर्ण देश पाहण्याची चांगली संधी मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.