Shweta Tiwari Suits : रक्षाबंधनसाठी बेस्ट आहेत श्वेता तिवारीचे हे फॅन्सी सलवार-सूट कलेक्शन... नक्की ट्राय करून बघा

Women Fashion : हा दिवस खास असल्याने या दिवशीचा लूकही तितकाच खास असायला हवा.
Shweta Tiwari Suits
Shweta Tiwari Suitssakal
Updated on

रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणींसाठी खूप खास असतो. या वर्षी रक्षाबंधन हा सण 19 ऑगस्ट रोजी येत आहे. हा दिवस खास असल्याने या दिवशीचा लूकही तितकाच खास असायला हवा. त्यामुळे या दिवशी कोणते कपडे घालावे? असा प्रश्न जर तुमच्या मनात येत असेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगतो.

आजकाल श्वेता तिवारीचा स्टायलिश लूक खूप पसंत केला जात आहे. चला तर मग पाहूया अभिनेत्री श्वेता तिवारीचा स्टायलिश सलवार-सूट. तसेच, हे सूट सुंदर दिसण्यासाठी आम्ही तुम्हाला सोप्या टिप्स सांगणार आहोत-

Shweta Tiwari Suits
Women Fashion : वेडिंग फंक्शन्ससाठी बेस्ट आहेत हे 'गरारा सूट', एकदा नक्की करून बघा, दिसाल सर्वात सुंदर

अनारकली सूट डिझाइन

कलीदारमध्ये अनारकलीसारख्या एव्हरग्रीन डिझाईन्सला प्राधान्य दिले जाते. काइनात बाय आंचल सहानी ने हा सुंदर वर्क सूट डिझाइन केला आहे. असे सूट तुम्हाला रेडीमेड बाजारात 3000 ते 5000 रुपयांना मिळतील.

प्रिंटेड सूट डिझाइन

प्रिंटेड डिझाईन्समध्ये, लाइट वेटच्या डिझाइन सूटला सर्वाधिक पसंती दिली जाते. हा सुंदर सूट डिझायनर सत्या पॉल इंडियाने डिझाइन केला आहे. या प्रकारच्या सूटमध्ये तुम्ही प्रिंटेड डिझाइनचा हेवी दुपट्टा कॅरी करू शकता. फुटवेअरमध्ये तुम्ही फ्लॅट्स घालू शकता.

चिकनकारी सूट डिझाइन

तुम्ही रक्षाबंधनाला चिकनकारी सूट देखील घालू शकता. या सूटमध्ये तुम्ही खूपच सुंदर दिसाल. हिपॉश डिझायनर ब्रँडने हा सुंदर सूट डिझाइन केला आहे. असे सूट तुम्हाला फ्रेश आणि सोबर लुक देण्यास मदत करतील. या प्रकारच्या सूटसोबत तुम्ही पर्ल डिझाईनचे कानातले घालू शकता. तसेच फुटवेअरमध्ये फ्लॅट्स किंवा हिल्स घालू शकता.

Related Stories

No stories found.